ओबीसी, भटके - विमुक्त, बराबुलेतेदार समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे - बाळासाहेब कर्डक - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

17/03/2025

ओबीसी, भटके - विमुक्त, बराबुलेतेदार समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे - बाळासाहेब कर्डक

 

जळगाव (प्रतिनिधी) : - -

         ओबीसी, भटके - विमुक्त, बराबुलेतेदार समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे - बाळासाहेब कर्डक

          जळगाव येथे ओबीसी नेते तथा माजी उमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी,भटके - विमुक्त, बराबुलेतेदार समाज मेळाव्याची नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात होती.

           सदर बैठकीत ओबीसी, भटके - विमुक्त, बराबुलेतेदार समाजातील सर्व समाजातील समाज बांधवांनची मोठ्या प्रमाणावर उपस्थीती होती. याप्रसंगी अखिल भारतीय महत्मा फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी आपले मनोगत मांडताना मेळाव्याची विस्तृत माहिती दिली. तसेच ओबीसी समाजाचा आरक्षणाचा विषय सद्या न्यायलयात सुरू आहे तसेच या देशात प्राणीची संख्या मोजली जाते ओबीसींची नाही ओबीसी समाज बांधवांची जनगणना होणे हे देखील अत्यंत गरजेचे आहे. कोर्टात सुरू असलेल्या केस मध्ये जर का आपल्या आरक्षणाला धक्का बसणार असेल आणि आपण बघत राहणार आहोत तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही.

        जळगाव जिल्ह्यातील सर्व समता परिषद आडवा बैठक घेण्याकरिता आलो असता बैठकीत समता परिषदेचे कार्यकर्त्यांच्या व ओबीसी समाज बांधवांचा आग्रह होता. की जळगावात ओबीसी,भटके - विमुक्त, बराबुलेतेदार समाज महामेळावा आयोजीत करण्यात यावा आणि तो आपले ओबीसी समजाचे नेते छगनरावजी भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला पाहिजे असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. आणि तो कार्यकर्त्यांनी केलेला विनंती संदेश मी भुजबळ साहेब यांचा पर्यंत पोहचवला आणि साहेबांची वेळ आपल्याला मिळाली आहे. तसेच कर्डक यांनी बोलताना ओबीसी मेळाव्याला का आले पाहिजे याचे महत्व समजवून सांगितले. सदर मेळाव्याची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू असून उत्तर महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित राहतील.
           यावेळी चंद्रशेखर कापडे, प्रमोद घुले माजी सभापती राजेंद्र घुगे पाटील, नगरसेवक डॉक्टर चंद्रशेखर पाटील, अनिल नाळे, वसंत पाटील, भूषण महाजन, रवींद्र माळी, संतोष इंगळे, कृष्णा माळी, ईश्वर चौधरी, मुरलीधर महाजन, माधवराव माळी, अप्पा माळी, ज्ञानेश्वर महाजन, सुभाष सैनी, राजेंद्र बारी, सुनील माळी असोदा, अमित माळी, निलेश पाटील, अशोक महाजन, प्रभाकर महाजन, रितेश माळी, सुनील माळी, सोमनाथ महाजन, मुरलीधर महाले, दिलीप माळी, गोपाल चौधरी, तुकाराम महाजन, नंदू माळी, एम आर महाजन,भिकन माळी, कैलास सैनी, चंद्रकांत कापसे, प्रमोद रुले, गवळी, सारिका ताई शिंपी यांचा सह अन्य ओबीसी भटके विमुक्त बारा बलुतेदार समाज बांधव उपस्थित होते.

         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदित्य माळी, यश माळी संदीप सोनवणे किरण माळी जयसिंग बारेला यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज