नितिन अहिरराव यांची इंडियन रेडक्रॉस सोसायटीवर सहयोगी सदस्य म्हणून निवड.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

31/03/2025

नितिन अहिरराव यांची इंडियन रेडक्रॉस सोसायटीवर सहयोगी सदस्य म्हणून निवड....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         नितिन अहिरराव यांची इंडियन रेडक्रॉस सोसायटीवर सहयोगी सदस्य म्हणून निवड....

        जळगांव जिल्हा इंडीयन रेडक्रॉस सोसायटीवर 3 वर्षाच्या अंतरिम कालावधीसाठी निवडलेल्या 63 नवीन सहयोगी सदस्यांमध्ये चोपडा येथील नक्षत्र ज्वेलर्स चे संचालक तसेच रोटरी परिवारातील श्री नितिन अहिरराव यांची निवड झाली.कालच जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद साहेब यांच्या हस्ते रेडक्रॉसचे सन्मानचिन्ह देऊन नितिन अहिरराव यांचा सत्कार करण्यात आला. नितिन अहिरराव हे रोटरी क्लब चोपडा चे माजी अध्यक्ष तसेच रोटरी 3030 सह प्रांतापाल आहेत. सामाजिक सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यलयातून निवड झाली आहे.

         पदग्रहण सोहळ्यात रेडक्रॉस सोसायटीचे पदाधिकारी गनीजी मेनन, विनोद जी बियाणी, डॉ.प्रसन्न कुमार रेदासानी, घनश्याम जी महाजन, सुभाष जी सांखला, विजय जी पाटील, पुष्पाताई भंडारी, शांताबाई वाणी, डॉ नरेन्द्र ठाकूर यासोबत इतर पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीबद्दल नितिन अहिरराव यांचे मित्र मंडळी तसेच रोटरी परिवाराकडून अभिनंदन होत आहे. 

        रेडक्रॉस ही जगातील 187 देशांमध्ये 70 लाख स्वयंसेवकांच्या सहकार्याने अखंडपणे सेवा देणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. सर हेनरी ड्यूनान्ट यांनी या आंतरराष्ट्रीय मानवतावादी सेवाभावी दृष्टीकोनातून संस्थेची स्थापना केली होती. भारतात दिल्ली येथे 1920 साली रेडक्रॉस सोसायटीची स्थापना झाली.

         रेडक्रॉस दिल्ली या राष्ट्रीय पातळीवर महामहीम राष्ट्रपती, तर राज्य पातळीवर महाराष्ट्रचे राज्यपाल, जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी या संस्थेला पदसिद्ध अध्यक्ष असतात. अशा या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेवर जळगाव जिल्हा शाखेवर नितिन अहिरराव यांची सहयोगी सदस्य म्हणून निवड झाली आहे.

       या संस्थेमार्फत मार्फत गरजूंना 24 तास रक्तसेवा उपलब्ध असते तसेच कॅन्सर संजीवनी मार्गदर्शन केद्र, रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्सन केंद्र, ईं सेतू सुविधा, निक्षय मित्र योजना, पर्यावरण व वृक्षारोपण संवर्धन असे अनेक उपक्रम संस्थेमार्फत चालू असतात.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज