चोपडा तहसील कार्यालयातील उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांचा पालकमंत्री यांचा हस्ते सन्मान... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

26/04/2025

चोपडा तहसील कार्यालयातील उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांचा पालकमंत्री यांचा हस्ते सन्मान...

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपडा तहसील कार्यालयातील उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांचा पालकमंत्री यांचा हस्ते सन्मान...

         जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथील नियोजन समिती सभागृहात दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी जिल्ह्यातील उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पालकमंत्री माननीय नामदार गुलाबराव पाटील‌ होते तसेच माजी आमदार श्री सुरेश भोळे, माजी आमदार किशोर पाटील , जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती.

          यावेळी चोपडा तहसील कार्यालयाला ई चावडी योजनेमध्ये सर्वाधिक गावांनी ऑनलाइन 100% वसुली केली या बाबी मध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार देण्यात आला.

         तसेच ई फेरफार मध्ये चोपडा तालुक्याचा फेरफार - (नोंदणीकृत व अनोंदणीकृत , विवाद ग्रस्त व अविवादग्रस्त) मंजुरीचा कालावधी जिल्ह्यात सर्वात कमी असल्यामुळे वेळेवर फेरफार मंजुर होत असल्या कारणाने सर्वोत्तम कामगिरीबद्दल देखील गौरवण्यात आले.

          त्याचप्रमाणे चोपडा तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती मध्ये देखील उत्कृष्ट काम केले असून नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त सर्व अनुदानित वेळेवर व तातडीने लाभार्थ्यांना वितरित करून ई केवायसी पूर्ण केल्याबद्दल देखील प्रथम क्रमांक असल्यामुळे ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.

          तिन्ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी तहसील कार्यालयाची वतीने तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार सचिन बांबळे, नायब तहसीलदार योगेश पाटील, मंडळ अधिकारी मनोज साळुंखे, रवींद्र माळी, अजय पावरा, बेलदार, अवल कारकून हेमंत हरपे, तलाठी भूषण पाटील, महसूल सहायक श्री उज्वल रवराळे हे उपस्थित होते.

         सद्यस्थितीत चोपडा तालुक्यातील 116 गावांपैकी 101 गावांनी 100% ऑनलाईन वसुली पूर्ण केली आहे केवळ 15 गाव 100% वसुली करायची बाकी असून लवकरच ती पूर्ण होतील.

         चोपडा तालुक्यातील कुठल्याही फेरफार सरासरी 16 दिवसात मंजूर केला जातो, तसेच ज्या फेब्रुवारी आक्षेप आहेत असे फेरफार देखील तातडीने सुनावणी घेऊन दोन महिन्याचे आत निकाली काढण्यात येतात.

          नैसर्गिक आपत्तीमध्ये तालुक्यातील बाधित खातेदारांना वेळोवेळी रकमा प्राप्त झाल्या, त्या बाधित व्यक्तींची त्यांना तातडीने मिळण्यासाठी सर्व माहिती संबंधित पोर्टलवर रोजच्या रोज अपलोड करण्यात आली जेणेकरून त्यांना विशिष्ट क्रमांक तातडीने प्राप्त होऊन ही केवायसी केल्यानंतर ऑनलाईन रक्कम त्यांचे खात्यावर जमा करण्यात आली.

          केवळ एप्रिल 2025 या महिन्यातील नैसर्गिक आपत्ती पंचनामे पूर्ण झालेल्या असून अनुदान वितरण संदर्भात‌ कारवाई बाकी आहे. असे तहसीलदार s महाराष्ट्र 7 न्युज शी बोलतांना सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज