तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी कर्तव्याला प्राधान्य देत सुटी असून देखील आदिवासी मुलीच्या कॅन्सर उपचारासाठी तातडीने उपलब्ध करून दिली शिधापत्रिका... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

26/04/2025

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी कर्तव्याला प्राधान्य देत सुटी असून देखील आदिवासी मुलीच्या कॅन्सर उपचारासाठी तातडीने उपलब्ध करून दिली शिधापत्रिका...

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी कर्तव्याला प्राधान्य देत सुटी असून देखील आदिवासी मुलीच्या कॅन्सर उपचारासाठी तातडीने उपलब्ध करून दिली शिधापत्रिका...

          वेले ता. चोपडा येथील आदिवासी कुटुंबातील शिवदास रामदास सोनवणे यांच्या मुलीला कॅन्सर असल्याचे निदान झाल्यानंतर संबंधितांना आर्थिक अडचणीमुळे उपचारासाठी शिधापत्रिकेची आवश्यकता होती. मात्र ती त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांनी शनिवार सुट्टी असताना तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधला असता तहसीलदार भाऊसाहेब थोरात प्रभारी पुरवठा अधिकारी योगेश पाटील व संगणक चालक शशीकांत जमादार यांनी त्यांच्याकडून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन त्यांना ई शिधापत्रिका वितरित केली.
         सदर ई शिधापत्रिका ही अन्नसुरक्षा योजनेसाठी पात्र असल्यामुळे त्या आधारे वैद्यकीय उपचार देखील घेणे शक्य होणार आहे. सदर मुलगी नंदिनीचे वय 11 वर्षे असून पुढील उपचारासाठी ती कुटुंबासह जळगावाला रवाना झाली आहे, तेथील उपचार नंतर ती मुंबईला रवाना होणार आहे.

        तहसीलदार भाऊसाहेब थोरात प्र. पुरवठा अधिकारी योगेश पाटील व कर्मचारी यांचे सुटी असून देखील तत्पुरतेने शिधापत्रिका उपलब्ध करून दिल्याने मुलीचा उपचार होण्यास मदत होईल. याबद्दल संबंधित कुटुंबाचे कुटुंब प्रमुख व अन्य सदस्यांनी सहकार्याबद्दल प्रशासनाचे धन्यवाद व्यक्त केले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज