महिला मंडळ शाळेचा निकाल 100 % ; मुलींनीच मारली बाजी - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

13/05/2025

महिला मंडळ शाळेचा निकाल 100 % ; मुलींनीच मारली बाजी

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         महिला मंडळ शाळेचा निकाल 100 % ; मुलींनीच मारली बाजी

          महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने ऑनलाईन जाहीर करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात येथील भगिनी मंडळ संचलित महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचा एकूण निकाल 100 टक्के लागला असून शाळेने उत्तम निकालाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षीही प्रथम पाच क्रमांकांमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे.
            विद्यालयातून प्रथम येण्याचा मान वैष्णवी दीपक माळी या विद्यार्थिनीने मिळवला असून तिला (95 • 20) टक्के गुण प्राप्त झाले आहेत. तर द्वितीय क्रमांक साक्षी प्रमोद बोरसे (93 • 80) व तृतीय क्रमांक कोमल विजय पाटील (89 • 80) यांनी प्राप्त केला. विद्यालयातील एकूण 35 विद्यार्थ्यांनी विशिष्ट योग्यता श्रेणी प्राप्त केली आहे.               

          यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, संस्थेच्या अध्यक्ष पूनम गुजराथी, उपाध्यक्ष छाया गुजराथी, सचिव उर्मिलाबेन गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी, प्रा. डॉ. आशिष गुजराथी, मुख्याध्यापक सुनील पाटील व सहकारीवृंदाने अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp