Post Top Ad
Responsive Ads Here
13/05/2025
Home
Unlabelled
उत्तुंग यशाची परंपरा कायम राखत विवेकानंद विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 %
उत्तुंग यशाची परंपरा कायम राखत विवेकानंद विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 %
चोपडा येथील विवेकानंद विद्यालयाने प्रतिवर्षाप्रमाणे यशाची व गुणवत्तेची परंपरा कायम राखत यावर्षी देखील दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. विद्यालयातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान उत्कर्ष प्रमोद कोतकर 95.40% , विद्यालयातून द्वितीय युगल सुखदेव पाटील 95.20% , विद्यालयातून तृतीय विनीत प्रकाश पाटील 95 % , विद्यार्थ्यांना मुलींमधून प्रथम जानवी नेताजी पाटील 91.40% विद्यालयाततून एकूण 141 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी विशेष गुणवत्तेत 86 विद्यार्थी , 90 पेक्षा जास्त 20 विद्यार्थी , प्रथम श्रेणीत 37 विद्यार्थी , द्वितीय श्रेणीत 16 विद्यार्थी , तर पास श्रेणीत 2 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 90% पेक्षा वर गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे सोहम संदीप लांडगे 94.60% , चेतन तुकाराम पाटील 94.40% , श्रेयस मोनेश बाविस्कर 94% , रोहित रवींद्र महाजन 93.80% , विवेक शिवहरी सानप 93.60% , अभय चंद्रकांत कोळी 93% , प्रणव संजय बजाज 92.20% , निलेश पांडूरंग सूर्यवंशी 92% , लोकेश समाधान पाटील 91.20% , रुचीर जितेंद्र देवरे 90.80% , आर्या विजय जोशी 90.80% , गुंजन कांतीलाल जैन 90.60% , उन्नती प्रफुल्ल गोसावी 90.60% ,भूमिका धनंजय सूर्यवंशी 90.40% , मयंक परेश बेहेरे 90.40% , वरून प्रशांत पाटील 90.20% या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर माजी अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड.रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळ, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व संस्थेचे विश्वस्त नरेंद्र भावे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अशा चित्ते इंग्लिश विभागाच्या मुख्याध्यापिका सुरेखा मिस्त्री ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य पी.जी. पाटील बालवाडी विभागाच्या प्रमुख माधवी भावे, उपमुख्याध्यापक पवन लाठी, संजय सोनवणे, उपशिक्षिका सरला शिंदे, कलाशिक्षक राकेश विसपुते, उपशिक्षक विजय पाटील, प्रसाद वैद्य यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद व पालकवर्ग यांनी अभिनंदन व कौतुक केले.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here





No comments:
Post a Comment