सीबीएसई शालांत परीक्षेत ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा चे विद्यार्थी तालुक्यात प्रथम - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

14/05/2025

सीबीएसई शालांत परीक्षेत ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा चे विद्यार्थी तालुक्यात प्रथम

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         सीबीएसई शालांत परीक्षेत ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा चे विद्यार्थी तालुक्यात प्रथम

         ऑक्सफर्ड इंग्लिश मिडियम स्कुल, चोपडा येथील विद्यार्थी अनिरुद्ध महेंद्र धनगर चोपडा तालुक्यात प्रथम तर लविश विशाल पालिवाल तालुक्यात द्वितीय तसेच तालुक्यातील मुलींमधून हिरल चेतन ठक्कर हिने प्रथम क्रमांक पटकावला. चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लीश स्कूल ने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उज्वल यशाची परंपरा कायम राखत चोपडा तालुक्यात प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. 

          चोपडा तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त करणारा चि. अनिरुद्ध महेंद्र धनगर याने 95 % गुण प्राप्त करून शाळेच्या व संस्थेच्या लौकिकात मानाचा तुरा रोवला आहे. चोपडा तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त करण्याचा मानही ऑक्सफर्ड शाळेलाच मिळाला असून चि. लविश विशाल पालिवाल यास 93•4 % गुण मिळवत प्राप्त केला आहे. तर तालुक्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांक हिरल चेतन ठक्कर या विद्यार्थिनीने प्राप्त केला आहे. तिला 91•2 % गुण मिळाले. 

          हर्षित कैलास पालिवाल - 92•2 %, मानस नरेन्द्र पाटील - 91•8 %, हिरल चेतन ठक्कर - 91•2 %, नाविन्य सुनील चौधरी - 90•4 %, श्रावणी नरेश शिंदे - 90•4 % या विद्यार्थ्यांना देखील शेकडा 90 % वर गुण प्राप्त झाले आहेत.

         शाळेतील 17 विद्यार्थ्यांना एकूण 80 ते 90 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. त्यात अभिनव अशोक साळुंखे - 89•4 %, हिमानी देवानंद  गेही - 86•6 %, राज दिनेश सोनवणे - 86•6 %, सृष्टी विष्णू सैंदाणे - 86•6 %, लक्ष्मी सुरेश महाजन - 85•8 %, हितेश अनिल पाटील - 85•6 %, सुष्मिता अनिल पाटील - 85•6 %, अनोषा फातिमा जीशान असद सय्यद - 85 %, यश निलाचंद पाटील - 84•6 %, आयुष रितेश जैन - 84 %, हार्दिक मनीष अग्रवाल - 83•6 %, कनक भरत धनगर - 83•6 %, वर्धमान दिलीप सपकाळे - 82•8 %, सर्वेश मच्छिंद्र सैंदाणे - 82•8 %, गार्गी नितीन चौधरी - 81•6 %, पारस अभय जैन - 80•2 % या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शाळेतील 39  विद्यार्थ्यांना शेकडा 70 % च्या वर गुण प्राप्त झाले आहेत 

         दर्जेदार शिक्षण आणि प्रतिभेचे संगोपन करण्याच्या शाळेच्या वचनबद्धतेमुळे उत्कृष्ट यश मिळाले आहेत. विद्यार्थ्यांना दीप्ती पाटील, विशाल मराठे, विशाखा बडगुजर, जगदीश पाटील, पूनम पाटील, हर्षा पाटील, शकिल अहमद या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

         महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डाॅ. स्मिता पाटील, शाळा समन्वयक एन. एस. सोनवणे, प्रा. डाॅ. डी. एस. पाटील, अशोक साळुंखे, विलास दारूंटे, डी. जी. सोमानी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, उपमुख्याध्यापिका अश्विनी खंडेराव पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज