सफाई कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा घरी जाऊन सत्कार — चोपडा नगरपरिषदेचा प्रेरणादायी उपक्रम ... उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन भत्ता जाहीर - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

15/05/2025

सफाई कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा घरी जाऊन सत्कार — चोपडा नगरपरिषदेचा प्रेरणादायी उपक्रम ... उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन भत्ता जाहीर

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          सफाई कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा घरी जाऊन सत्कार — चोपडा नगरपरिषदेचा प्रेरणादायी उपक्रम ...  

      उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन भत्ता जाहीर

          शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे सामर्थ्य आहे, हे अधोरेखित करणारा एक स्तुत्य उपक्रम चोपडा नगरपरिषदे मार्फत राबवण्यात आला. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल पाटील व त्यांच्या पत्नी सौ. पाटील यांच्या विशेष उपस्थितीत, दहावी व बारावी परीक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या सफाई कामगार व नगरपरिषद कर्मचारी यांच्या पाल्यांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.
           या उपक्रमांतर्गत 05 नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे पाल्य, 09 सफाई कामगारांचे पाल्य, एक सफाई कामगाराची पत्नी व एक महिला सफाई कामगार यांनी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत, पाटील दांपत्याने त्यांच्याकडे घरी जाऊन सत्कार केला व सन्मानचिन्ह व भेटवस्तू देत त्यांचे मनोबल उंचावले.

          या विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी चोपडा नगरपरिषदेने महत्त्वपूर्ण ठराव केला असून, सफाई कर्मचारी, त्यांच्या पत्नी किंवा पाल्य यांनी दहावी उत्तीर्ण केल्यास 10000 रुपये व बारावी उत्तीर्ण केल्यास 15000 रुपये प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात येणार आहे. हा निर्णय नगरपरिषदेच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आला असून, यामुळे वंचित घटकांना शिक्षणात आर्थिक आधार मिळणार आहे.
           या वेळी न पा मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी सांगितले, "सफाई कामगारांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या पाल्यांनी शिक्षणात मिळवलेले हे यश समाजाच्या प्रगतीचे प्रतीक आहे. या विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत."

           सत्कार समारंभाच्या वेळी सौ. पाटील यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, "या मुलांनी प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणात यश मिळवले आहे, हे खूपच अभिमानास्पद आहे. त्यांच्या यशामागे पालकांचे अपार कष्ट आहेत. समाजातील प्रत्येक मुलाला संधी मिळाली पाहिजे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे."
         या उपक्रमामुळे केवळ विद्यार्थीच नव्हे, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आत्मसन्मान व प्रेरणा लाभली असून, शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवण्याची ही वाटचाल अधिक बळकट झाली आहे. चोपडा नगरपरिषद उपक्रम राबविताना उपमुख्य अधिकारी संदीप गायकवाड, स्वच्छता निरीक्षक दिपाली साळुंके, लिपिक उमेश कापरे, मुकादम किशोर पवार, मक्तेदार भारत देशमुख आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज