श्री संत सावता माळी युवक संघांचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन व S महाराष्ट्र 7 न्युज यांचे तर्फे महाज्योती कडून मिळणाऱ्या टॅब योजनेचा फॉर्म भरण्याचे आवाहन.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

16/05/2025

श्री संत सावता माळी युवक संघांचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन व S महाराष्ट्र 7 न्युज यांचे तर्फे महाज्योती कडून मिळणाऱ्या टॅब योजनेचा फॉर्म भरण्याचे आवाहन....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          श्री संत सावता माळी युवक संघांचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन व S महाराष्ट्र 7 न्युज यांचे तर्फे महाज्योती कडून मिळणाऱ्या टॅब योजनेचा फॉर्म भरण्याचे आवाहन....

         या वर्षी इयत्ता 10 वी परीक्षा पास OBC , VJNT आणि SBC विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची सुचना!

        JEE NEET MH-CET चे मोफत ऑनलाईन प्रशिक्षण, शिवाय मोफत आठ इंची टॅब, आणि दररोजचा 6 GB इंटरनेट डेटा मोफत!

           महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे! या महाज्योतीच्या वतीने, या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी वर्ग 11 वी सायन्स मध्ये प्रवेश घेतलेला आहे, व जे विद्यार्थी 12 वी नंतर इंजिनियरींग मेडीकल मधे प्रवेश घेण्यासाठी 2027 ची JEE / NEET व MH-CET ची स्पर्धा परीक्षा देवु इच्छितात! परंतु त्यासाठी लाखो रूपयाचे महागडे कोचिंग क्लास लावु शकत नाही. अशा OBC , VJNT व SBC विद्यार्थ्यांसाठी, महाज्योतीच्या वतीने मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

        त्यासाठी या विषयातले अत्यंत तज्ञ प्राध्यापक हे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देईल. ऑनलाईन प्रशिक्षण देत असतांना ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांजवळ चांगले किंवा मोबाईल नसतात... ही गरज लक्षात घेवुन,महाज्योती अशा सर्व विद्यार्थ्यांना अगदी मोफत टॅब देत आहे. या शिवाय या टॅब सोबतच दर दिवशी 6 GB इंटरनेट डेटा सुध्दा ऑनलाईन क्लास पहाता यावा,म्हणुन अगदी मोफत देत आहे. ते पुढील शिक्षणासाठीही त्यांना कामी येतील. तसेच या JEE / NEET MH-CET स्पर्धा परीक्षेची सर्व पुस्तके विद्यार्थ्यांना मोफत घरपोच दिली जातील.

           यासाठी विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या वेबसाईटवर जावुन, तिथे APPLICATION FORM FOR JEE/NEET/MHT-CET TRAINING 2025-27  या नोटीसबोर्डवरील जागेवर क्लीक करावे! त्यावर पुढे दिलेला फार्म दिसेल! तो ऑनलाईन पध्दतीने भरून त्यात नमुद केलेली कागदपत्रे अपलोड करावीत!तसेच आपला संपुर्ण अर्ज अपलोड केल्यावर त्याची प्रत काढुन जवळ ठेवावी.

         ही आपली नोंदणी महाज्योतीकडे करण्यासाठी 31 मे 2025 ही अंतिम तारीख आहे. तरी विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी महाज्योतीच्या या योजनेचा फायदा घ्यावा.

             @ अधिक माहितीसाठी संपर्क @

                      जितेंद्र सुरेश महाजन

                            प्रदेशाध्यक्ष

श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य

मो 9021707519

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज