Post Top Ad
Responsive Ads Here
16/05/2025
Home
Unlabelled
चोपडा महाविद्यालयात एमबीए व एमसीए अभ्यासक्रमास मान्यता: अॅड. संदीप पाटील
चोपडा महाविद्यालयात एमबीए व एमसीए अभ्यासक्रमास मान्यता: अॅड. संदीप पाटील
चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय या नॅक द्वारे A+ ग्रेडने नामांकीत महाविद्यालयात अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली (एआयसीटीई) यांचेकडून शैक्षणिक वर्ष 2025/26 साठी व्यवस्थापन विद्याशाखे अंतर्गत एमबीए व एमसीए या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. लवकरच महाराष्ट्र शासन व विद्यापीठाचे संलग्नीकरण प्राप्त होऊन या शैक्षणिक वर्षापासून चोपडा तालुका व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना व्यवस्थापन विद्याशाखे अंतर्गत एमबीए व एमसीए अभ्यासक्रमास प्रवेश उपलब्ध होतील. विद्यापीठ परिक्षेत्रात कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात एमबीए व एमसीए अभ्यासक्रमास मान्यता मिळणारे एकमेव महाविद्यालय असल्याने याचा मनस्वी आनंद होत आहे. दोन्ही अभ्यासक्रमांसाठी 60 - 60 विद्यार्थ्यांची तुकडी मंजूर करण्यात आलेली आहे. या सर्व अभ्यासक्रमांच्या उपलब्धतेसाठी संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. सौ. स्मिता संदीप पाटील यांनी अनमोल मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, समन्वयक डॉ. शैलेश वाघ , उपप्राचार्य डॉ. के एन. सोनवणे, एमबीए / एमसीए अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. अभिजीत साळुंखे, डॉ. दीनानाथ पाटील सर्व उपप्राचार्य , रजिस्ट्रार, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. एमबीए व एमसीए अभ्यासक्रमास मान्यता मिळाल्याने तालुक्यातील विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. अत्याधुनिक व सुसज्ज संगणक प्रयोगशाळा व वर्गासह महाविद्यालय परिसरात स्वतंत्र 5 मजली इमारत प्रस्तुत अभ्यासक्रमांसाठी निर्माण करण्यात आलेली आहे. संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी अभ्यासक्रमास मंजुरी मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले. प्रस्तुत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. के. एन. सोनवणे, प्रा. आर. एम. बागुल, डॉ. ए. बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ व रजिस्ट्रार श्री डी. एम. पाटील यांनी केले.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here





No comments:
Post a Comment