Post Top Ad
Responsive Ads Here
02/06/2025
Home
Unlabelled
चोपडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष) सुनिल पाटील यांच्या तर्फे गुणवंतांचा सत्कार
चोपडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष) सुनिल पाटील यांच्या तर्फे गुणवंतांचा सत्कार
चोपडा तालुक्यातील 10वी व 12वी त प्रथम आलेल्या 180 विध्यार्थी विद्यार्थीनीचा व त्यांच्या मुख्याध्यापकांचा सन्मान सोहळा काल नाट्यगृहात पार पडला. तालुक्यात प्रथमच चोपडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष) सुनिल पाटील यांच्या तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी माजी मंत्री आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील, माजी आमदार कैलासबापू पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, प्रदेश सरचिटणीस रविंद्र नानाजी पाटील, कार्याध्यक्ष योगेश देसले, डाँ. पि एस पाटील, तालुकाध्यक्ष बाळासाहेब विजय पाटील, नारायण पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सौ सोनाली ताई पाटील, उपजिल्हाध्यक्ष परेश देशमुख, शहराध्यक्ष गिरीश देशमुख, निलेश पाटील, महिला शहर अध्यक्ष मायाताई महाजन, सविता ताई पाटील, सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष मिलिंद सोनवणे, रविंद्र चौधरी, सोशल मीडिया अध्यक्ष वलय पाटील, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. तालुक्यात प्रथमच गुणवंत विद्यार्थी व मुख्याध्यापक यांचा सन्मान सोहळा घेण्यात आल्याने उत्स्फूर्तपणे पालक विद्यार्थी व शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. अतिशय आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाने शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मान्यवरांच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त होतांना दिसत होता.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here





No comments:
Post a Comment