दादासाहेब डॉ सुरेश जी. पाटील महाविद्यालयत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

18/06/2025

दादासाहेब डॉ सुरेश जी. पाटील महाविद्यालयत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ...

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          दादासाहेब डॉ सुरेश जी. पाटील महाविद्यालयत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ...

       चोपडा महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ सुरेश जी. पाटील महाविद्यालय येथे वैदयकिय, अभियांत्रिकी, नर्सिग औषधनिर्माणशास्र अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या विविध पात्रता परीक्षा मध्ये उत्तीर्ण  झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला वैदयकिय अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या NEET परीक्षेत महाविद्यालयातील 5 विद्यार्थ्यानी 400 पेक्षा जास्त गुण, 10 विद्यार्थ्यानी 300 पेक्षा जास्त गुण मिळवत घवघवीत यश प्राप्त केले. त्यात कु. प्रांजल खंडेराव पाटील हिने 483 गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला तसेच अभियांत्रिकी प्रवेश अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या MHT-CET (PCM) परीक्षेत महाविदयालयातील 17 विद‌यार्थी 90 पर्सेंटाईल पेक्षा जास्त गुण  मिळवून उत्तीर्ण झाले.  त्यात चि. नयन कपिलकुमार मगरे हा विद्यार्थी 98•28% मिळवत महाविद्‌यालयातून प्रथम आला तसेच औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या MHT-CET (PCB) परीक्षेत 6 विद्यार्थ्यानी 95 पर्सेंटाईल पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले. त्यात कु. गायत्री ज्ञानेश्वर मोरे  ही विद्यार्थिनी 99•97  पर्सेंटाईल मिळवत तसेच MHT-CET (Nursing) यात देखील 99•85 पर्सेंटाईल   मिळवत दोघी परीक्षेत प्रथम आली.
           यासर्व गुणवंत विदयार्थीचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष अॅड. संदिप सुरेश पाटील व संस्थेचे सचिव डॉ. सौ. स्मिता संदिप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वेळेचे योग्य नियोजन व योग्य परिश्रम घेतले तर यश निश्चित मिळते. व याची प्रचिती महाविद्‌यालयातील विद‌यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही दिली असल्याची भावना अध्यक्षांनी व्यक्त केली, पुढे बोलतांना विद्यार्थ्यांच्या यशात पालकांचा तसेच शिक्षक व महाविदयालयातील सर्वच घटकांचा मोलाचा वाटा आहे. व सर्व विध्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

          महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे यांनी महाविद्यालयातील विविध शाखांची तसेच महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्याना पुरविल्या जाणाऱ्या भौतिक सुविधांची माहिती देत विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या. या वेळी तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. व्ही. एन. बोरसे यांनी तंत्रनिकेतन महाविद्यालयाविषयी तसेच नविन सुरु होणाऱ्या  अभियांत्रिकी महावि‌द्यालयाची बद्दल तसेच वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांचे महितीपर मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमात वि‌द्यार्थी पालक प्रतिनिधी सौ. वर्षा शिंदे व श्री खंडेराव पाटील यांनी महावि‌द्यालयाबद्दल व संस्थेबद्दल समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात उप‌प्राचार्य श्री एस पी पाटील सर यांनी CET, NEET, JEE या परीक्षान बाबत मार्गदर्शन केले.
           कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. कांचन पाटील यांनी केले तर आभार सौ शिरीन सैय्यद यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील पर्यवेक्षक श्री. ए. एन. बोरसे, वरिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. शैलेश वाघ, कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक श्री. पी. एस. पाडवी तसेच श्री. पी. व्ही. पाटील, श्री. समाधान पाटील, डॉ. डी. ए. तायडे, श्री. आर. इ. लांडगे, श्री. रोहन सोनवणे, श्रीमती. ए. पी. लांडगे, सौ. राजश्री निकम, सौ. दीपाली पाटील, सौ. पुष्पा दाभाडे, सौ. कीर्ती मोरे, सौ. आरती बोरसे, सौ. सुवर्णा पवार, सौ. धनश्री पाटील इ. शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज