Post Top Ad
Responsive Ads Here
16/06/2025
Home
Unlabelled
गणपूर येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिल्या दिवशी प्रवेशीत विद्यार्थ्यांचे ट्रॅक्टर सजवून प्रभात फेरी
गणपूर येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिल्या दिवशी प्रवेशीत विद्यार्थ्यांचे ट्रॅक्टर सजवून प्रभात फेरी
आज सर्वत्र शाळा उघडून शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेश घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दालनात प्रवेश करण्याची ही सुरुवात असते, अशाच पहिलीच्या वर्गात प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांची येथे सजवलेल्या ट्रॅक्टरवर झेंडा पताका लावत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी शैक्षणिक गीतांबरोबर देशभक्तीपर गीते वाजविण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षणप्रेमी त्याच बरोबर शाळेतील शिक्षक, शिक्षिका यांनी या प्रभात फेरीत सहभाग घेतला. त्यानंतर शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले आणि शैक्षणिक सत्राला मोठ्या आनंदात सुरुवात करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मुख्याध्यापक संजीव पाटील यांनी प्रास्ताविक करत मनोगतातून शाळेच्या पहिल्या सत्राबद्दल माहिती दिली. किशोर पाटील यांनी सूत्रसंचालन केले राजेंद्र पारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी सरपंच भूषण गायकवाड, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रोहिणी बेहेरे, मिराबाई पाटील, बाबुराव पाटील, अजित पाटील, संजय पाटील, नितीन पाटील, विनोद पाटील, पुरुषोत्तम पाटील, ब्रिजलाल भावसार, नरेंद्र पाटील व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here




No comments:
Post a Comment