चोपडा तालुक्यासाठी शासकीय गोदाम लोकार्पण व नुतन वजन काटा भूमिपूजन सोहळा संपन्न.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

22/06/2025

चोपडा तालुक्यासाठी शासकीय गोदाम लोकार्पण व नुतन वजन काटा भूमिपूजन सोहळा संपन्न....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         चोपडा तालुक्यासाठी शासकीय गोदाम लोकार्पण व नुतन वजन काटा भूमिपूजन सोहळा संपन्न....

       चोपडा तालुक्यातील शासकीय गोदामासाठी विशेष लक्ष देऊन मंजुरी आणणाऱ्या माजी आ. श्रीमती लताताई सोनवणे, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता वीरेंद्र राजपूत, पुरवठा तपासणी अधिकारी श्रीमती किरण मेश्राम, पुरवठा निरीक्षक श्रीमती मेघना गरुड व गोदाम व्यवस्थापक योगेश ननावरे यावेळी उपस्थित होते.
           नाबार्डच्या रु. 5 कोटी अर्थसहाय्यातुन 1800 मॅट्रिक टन क्षमतेचे गोदाम पूर्ण झाल्यामुळे चोपडा येथील जुन्या गोदामातून होणारे कामकाज आताचे नूतन सुसज्ज गोदामातून होणार आहे. निसर्गरम्य परिसरात सुरक्षा रक्षक केबिन, विद्युत व्यवस्था, वजन काटा या सर्व सुविधा गोदामात देण्यात आल्या आहेत.
          शासन निर्देशानुसार तिप्पट क्षमतेचे गोदाम निर्माण झाल्यामुळे सर्व स्वस्त धान्य दुकानदार व परिणामी लाभार्थी यांना विविध वेळेत अन्नधान्य पुरवठा करणे शक्य होणार आहे, गोदामाचे जवळच औद्योगिक महामंडळाचे जागेवर लवकरच भूखंड वाटप होणार आहे. त्यामुळे या परिसरात औद्योगिक विकास देखील दृष्टिक्षेपात आहे असे माननीय आमदार यांनी आपले मनोगतामध्ये स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज