चोपडा (प्रतिनिधी) : - -
चहार्डी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न....!
महाराष्ट्र राज्याच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” अंतर्गत चोपडा तालुक्यातील सर्व गावांना एकत्रित महसूल व सर्वसमावेशक शासकीय सेवा शिबीराचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून विविध योजनेचे लाभ व धनादेश प्रदान केले. या शिबिरात 1400 ते 1500 नागरिकांनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला. शासनाच्या विविध विभागांनी एकत्रितपणे सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच प्रशासनाची सुविधा सुलभतेने मिळाली. तसेच या कार्यक्रमाला श्री रोहित निकम , रावसाहेब पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा, प्रकाश रजाळे घोडगाव, चंद्रकला ताई दत्तात्रय पाटील सरपंच चहार्डी, तहसीलदार चोपडा भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी अनिल विसावे, सार्वजनिक विभाग विरेंद्र राजपूत, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.प्रदिप लासुरकर, महावितरणचे अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, सर्व तालुका स्तरीय अधिकारी, कर्मचारी व मंडळ स्तरावरील यंत्रणा आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे कार्यक्रम सूत्रसंचालन व समारोप - भूषण पाटील (ग्राम महसूल अधिकारी, तहसील कार्यालय चोपडा) यांनी केले. या शिबिरामुळे नागरिकांना गावातच शासनाच्या विविध सेवा मिळाल्याने प्रशासना विषयी त्यांनी समाधान व सकारात्मक भावना व्यक्त केल्या.
WhatsApp
No comments:
Post a Comment