केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी राष्ट्रीय महामार्ग बुऱ्हाणपूर - अंकलेश्वर रस्ता चौपदरीकरण संदर्भात समस्या जाणून घेण्यसाठी फैजपूर (यावल) येथे बैठक... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

03/06/2025

केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी राष्ट्रीय महामार्ग बुऱ्हाणपूर - अंकलेश्वर रस्ता चौपदरीकरण संदर्भात समस्या जाणून घेण्यसाठी फैजपूर (यावल) येथे बैठक...

 

यावल (प्रतिनिधी) : - -

        केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी राष्ट्रीय महामार्ग बुऱ्हाणपूर - अंकलेश्वर रस्ता चौपदरीकरण संदर्भात समस्या जाणून घेण्यसाठी फैजपूर (यावल) येथे बैठक...

        बुऱ्हानपूर - अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग एनएच 753 बी तळोदा जंक्शन जवळ सुरु होणारा तळोदा - शिरपूर - चोपडा - यावल - फैजपूर - सावदा - रावेर या मध्यप्रदेश महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असलेल्या 240 किमी महामार्गाच्या चौपदरीकरण मंजूर झालेले असून याबाबत जमीन संपादन व इतर प्रक्रिया प्रगतीपथावर असून, सदर महामार्गाच्या चौपदरीकरण बाबतीत भूसंपादन होत असलेले शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या अनेक समस्या येत असल्याने आज फैजपूर (यावल) येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, आमदार श्री. अमोल हरिभाऊ जावळे व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन संबंधितांच्या सर्व समस्या व मागण्या जाणून घेतल्या व याबाबत लवकरच योग्यती कार्यवाही करून पाठपुरावा करणे बाबत आश्वासन दिले.
          यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, आमदार श्री. अमोल हरिभाऊ जावळे, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व स्थानिक सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चोपडा, यावल व रावेर तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज