चोपडा येथील UAIPM FOUNDETION तर्फे अमळनेर ते पंढरपूर पायी दिंडीत जलसेवा.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

16/06/2025

चोपडा येथील UAIPM FOUNDETION तर्फे अमळनेर ते पंढरपूर पायी दिंडीत जलसेवा....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपडा येथील UAIPM FOUNDETION तर्फे अमळनेर ते पंढरपूर पायी दिंडीत जलसेवा....

           चोपडा येथील UAIPM FOUNDETION मार्फत खान्देशातील प्रती पंढरपूर समजले जाणारे अमळनेर येथील वाडी संस्थानचे सखाराम महाराजांचे गादीपती श्री प्रसाद महाराज यांच्या आषाढी पायी वारीला सुरूवात झाली असता त्या निमित्ताने अमळनेर ला तुळशीबागेत महाराजांन बरोबर पायी वारी करणारे व महाराजांना निरोप देणारे भक्तगण यांची आज मंदीयाळी जमली होती. 
          त्या सर्वांना UAIPM FOUNDETION तर्फे आणि गुरू बंधु परीवारा तर्फे अमळनेर ते पंढरपूर पायी दिंडी साठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली त्या साठी 500 लिटर साठवण होईल ऐवढे जार घेऊन स्वतंत्र वाहना द्वारे पुढील 24/25 दिवस वारीतील लोकांना शुद्ध व थंडगार पाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
          त्यावेळेस वाडी संस्थानचे सखाराम महाराज गादीपती श्री प्रसाद महाराज यांच्या हस्ते थंडगार जार अमृत जलाचे प्राशन केले आहे. यावेळी UAIPM FOUNDETION चोपडा संस्थापक अध्यक्ष उदयकुमार अग्निहोत्री उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज