चोपडा तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत 8/7/2025 रोजी निघणार.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

04/07/2025

चोपडा तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत 8/7/2025 रोजी निघणार....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - - 

          चोपडा तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत 8/7/2025 रोजी निघणार....

         ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांचेकडील दिनांक 13 जून 2025 रोजीच्या अधिसुचनेनुसार दिनांक 5 मार्च 2025 रोजीची अधिसुचना अधिक्रमित करण्यात आलेलो असून प्रस्तुत अधिसूचना मधील अनुसूची 2 मध्ये जळगाव जिल्हयातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायती वगळून इतर सर्व ग्रामपंचायतीकरीता अनुसूचित जातों अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण सरपंच पदाचे आरक्षण वाटप करण्यात आलेले आहे त्यामुळे जिल्हाधिकारी जळगाव यांचकडील दिनांक 11/4/2025 च्या आदेशान्वये उपरोक्त "र्वगांकरीता तालुकानिहाय वाटप करण्यात आलेले सरपंच पदाचे आरक्षण अधिक्रमित करण्यात आलेले आहे.

           जिल्हाधिकारी जळगाव यांचे कडील क्रमांकः ग्रामपं/इ-ऑफिस/2053915/2025-COLLJG-19011/95/2025 दिनांक 30/6/2025 रोजीच्या पत्रानुसार चोपडा तालुक्यातील, 79 ग्रामपंचायतीमधील सर्व नागरीक तसेच सर्व राजकीय पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, यांना या निवेदनाव्दारे जाहीर विनंती करण्यांत येते की, चोपडा तालुक्यातील अनुसुचित क्षेत्रातील ग्रामपंचायती वगळून उर्वरीत एकूण 79 ग्रामपंचायती लासुर, चौगांव, मामलदे, चुंचाळे, मोजे हिंगोणे, मजरे हिंगोणे, गणपुर, भवाळे, गलंगी, वेळोदे, घोडगांव, कुसंबे, विरवाडे, वडती, अंबाडे, वर्डी, माचले, तावसे खुर्द, मंगरुळ, बराड, नागलवाडी, आडगाव, नरवाडे, काजीपुरा, अकुलखेडे, वेले, मजरेहोळ, गरताड, अजंतिसिम, मोहिदे, दगडी बु, अनयदे बु, वढोदे, विटनेर, बाळकी, मालखेडे, बुधगांव, अनवर्दे खुर्द, हातेड खुर्द, गलवाडे, हातेड बु, भाई, चहार्डी, विचखेडे, धुपे बु, घाडवेल, दोंदवाडे, तांदलवाडी, निमगव्हाण, खाचणे, तावसे बु, कुरवेल, धनवाडी, घुमावल बु. खडगाव, गोरगांवले बु, कोळंबा, सनफुले, कठोरे, गोरगांवले खु. भोकरी, सुटकार, वटार, वडगाव बु, अडावद, लोणी, खडर्डी, बिडगाव, वरगव्हाण, पंचक, धानोरा प्र.अ., देवगांव, पारगांव, चांदसणी, रुखनखेडे प्र.अ. कमळगांव, पिंप्री, मितवाली, पुनगांव मधुन अनुसूचीत जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाकरीता ग्रामपंचायत निहाय सरपंच निश्चीत करण्या बाबतची कार्यवाही दिनांक 8/7/2025 (मंगळवार) रोजी नवीन प्रशासकीय ईमारत, जुना शिरपुर रोड, ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ, तहसिल कार्यालय, चोपडा येथील बैठक सभागृह या ठिकाणी ठिक सकाळी 11:00 वाजता सुरु करण्यात येणार आहे.

          तसेच उपरोक्त प्रमाणे निश्चीत केलेल्या सरपंच पदांमधुन, महिलांसाठी आरक्षण (अनुसुचित जातो, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसह) राखून ठेवण्याची कार्यवाही मा. उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग अमळनेर यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय येथे त्याच दिवशी दुपारी 2:00 वाजता सुरु करण्यात येणार आहे.

         तरी सदरील आरक्षण सोडतीस उपरोक्त प्रामपंचायतीचे सर्व नागरीक, प्रामस्थ, राजकीय पक्ष व संघटना पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी उपस्थित रहावे, ही विनती असे आवाहन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज