खुशखबर ! ! मालमत्ता धारकांसाठी... चोपडा नगरपरिषदेकडून मालमत्ता धारकांसाठी अभय योजना जाहीर..... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

11/07/2025

खुशखबर ! ! मालमत्ता धारकांसाठी... चोपडा नगरपरिषदेकडून मालमत्ता धारकांसाठी अभय योजना जाहीर.....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

            खुशखबर ! ! मालमत्ता धारकांसाठी...

        चोपडा नगरपरिषदेकडून मालमत्ता धारकांसाठी अभय योजना जाहीर...

        शास्ती (थकीत करावरील दंड व्याज) मध्ये 50 % पेक्षा अधिक सूट....

         चोपडा नगरपरिषद क्षेत्रातील मालमत्ता धारकांसाठी एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. नगरपरिषदेकडून थकीत मालमत्ता करावरील शास्ती रक्कम माफ करण्यासाठी “अभय योजना” राबवण्यात येत असून, या योजनेअंतर्गत मालमत्ता धारकांना त्यांच्या शास्तीवर 50 % किंवा त्यापेक्षा अधिक सवलत दिली जाणार आहे.

          नगरपरिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक मालमत्ता धारकांकडे विविध कारणांमुळे मालमत्ता कराची थकबाकी आहे. या थकबाकीमुळे त्यांच्या करावर मोठ्या प्रमाणात शास्ती आकारली गेली आहे. या शास्तीच्या ओझ्यामुळे मालमत्ता धारकांना कर भरणे कठीण जात होते. या पार्श्वभूमीवर, नागरिकांना दिलासा देण्यासाठी व करसंकलन वाढवण्यासाठी नगरपरिषदेकडून अभय योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

         मालमत्ता धारकांना अभय योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 14 जुलै 2025 ते 30 जुलै 2025 या कालावधीत संधी उपलब्ध आहे. ही योजना केवळ एकदाच राबवण्यात येणार असल्यामुळे, दिलेल्या कालावधीत अर्ज न करणाऱ्या मालमत्ता धारकांना याचा लाभ घेता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

         तरी वरील कालावधीत मालमत्ता धारकांनी अर्ज करून 

🔴  आधार कार्डाची छायाप्रत

🔴  मालमत्ता कराचे अद्यावत बिल

🔴  संपूर्ण पाणीपट्टी भरल्याची पावतीची छायाप्रत

🔴  शास्ती वगळता संपूर्ण थकीत मालमत्ता कर भरल्याची पावतीची छायाप्रत... असा अर्ज तयार करून मालमत्ता धारकांनी आपला अर्ज व वरील कागदपत्रे घेऊन चोपडा नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क साधावा.

          नगरपरिषदेने नागरिकांना असे आवाहन केले आहे की, ही सुवर्णसंधी असून जास्तीत-जास्त मालमत्ता धारकांनी याचा लाभ घ्यावा. शास्तीमाफी मुळे करभरणा सुलभ होईल व थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळेल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज