चोपडा नगरपरिषदेत स्वच्छ भारत अभियान 2.0 व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था व CBO कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

08/07/2025

चोपडा नगरपरिषदेत स्वच्छ भारत अभियान 2.0 व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था व CBO कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न...

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

        चोपडा नगरपरिषदेत स्वच्छ भारत अभियान 2.0 व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था व CBO कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न...

        चोपडा नगरपरिषदेत स्वच्छ भारत अभियान 2.0 आणि स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत महिला स्वयंसहायता बचत गट, स्थानिक स्वयंसेवी संस्था व कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन (CBO) यांच्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. राहुल पाटील यांच्या मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यशाळेला परिसरातील सुमारे 80 महिला बचत गट सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच कार्यशाळेचा उद्देश कचरा व्यवस्थापनातून उपजीविकेच्या संधी निर्माण करणे, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे तसेच ‘शून्य कचरा’ (Zero Waste) संकल्पना प्रत्यक्षात आणणे हा होता. महिलांना कचरा व्यवस्थापन प्रक्रियेत सक्रिय सहभागी करून घेतल्यास शहराच्या स्वच्छतेला चालना मिळेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
          या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन करताना अधिकारी व तज्ञांनी खालील मुद्द्यांवर सविस्तर माहिती दिली , ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे, कंपोस्ट खत निर्मिती, रद्दी व प्लास्टिक रिसायकलिंग यासारख्या उपक्रमांमधून रोजगार संधी कशा निर्माण होतील, याबद्दल स्पष्टीकरण देण्यात आले. बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायाची उभारणी, भांडवलाची अचूक गुंतवणूक व त्यातून मिळणाऱ्या नफ्याची योजना कशी तयार करावी याविषयी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.

         महिलांच्या सहभागामुळे ‘Zero Waste’ शहराच्या दिशेने कशी वाटचाल करता येईल, याबद्दल उदाहरणांसह माहिती देण्यात आली. कार्यशाळेच्या शेवटी महिलांनी आपले अनुभव व्यक्त करताना सांगितले की, “आम्हाला या कार्यक्रमामुळे नवीन दृष्टीकोन मिळाला आहे. यापुढे आमच्या बचत गटाच्या माध्यमातून आम्ही कचरा व्यवस्थापन उपक्रम राबवण्यास तयार आहोत.”
         मुख्याधिकारी श्री. राहुल पाटील यांनी सांगितले की, “महिला बचत गटांचा सहभाग हा स्वच्छ भारत अभियानाच्या यशाचा कणा ठरेल. कचरा व्यवस्थापन ही केवळ स्वच्छतेसाठी नाही, तर महिलांच्या अर्थसामर्थ्यवृद्धीसाठीही संधी निर्माण करणारी प्रक्रिया आहे.”

         या कार्यक्रमाला उपमुख्याधिकारी - संजय मिसर, शहर अभियान व्यवस्थापक - गणेश पाठक, स्वच्छता निरीक्षक - साळुंखे मॅडम, नगरपरिषद कर्मचारी, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज