शिक्षक ते अध्यात्मिक समुपदेशक आर डी पाटील यांचा प्रवास.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

29/07/2025

शिक्षक ते अध्यात्मिक समुपदेशक आर डी पाटील यांचा प्रवास....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          शिक्षक ते अध्यात्मिक समुपदेशक आर डी पाटील यांचा प्रवास....

         शिक्षक, समाजसेवक, पत्रकार , प्रकाशक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सक्रीय व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले राजेंद्र पाटील उर्फ आर. डी. पाटील यांनी आता अध्यात्मिक समुपदेशन या नव्या व जागतिक दृष्टिकोनातून विकसित होत असलेल्या क्षेत्रात प्रभावी पाय ठेवला आहे.

          विविध विषयांवर गाढा अभ्यास असलेले आणि अध्यात्मातील खोल रुची जोपासणारे आर. डी. पाटील यांनी मागील दोन वर्षांपासून समुपदेशनाच्या क्षेत्रात सातत्याने आत्मविकास साधत महत्वपूर्ण प्रशिक्षण व अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. त्यात प्रगत पदविका : समुपदेशन व मानसिक आरोग्य या विषयात त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक व ब्रह्माकुमारीज एज्युकेशन विंग, माउंट अबू ( राजस्थान ) यांच्या संयुक्त विद्यमाने एक वर्षाचा ऑफलाईन कोर्स ते 75 % गुणांसह यशस्वीपणे उत्तीर्ण झाले आहेत.

        🔹 स्पिरीच्युअल कौन्सिलिंग (अध्यात्मिक समुपदेशन) विशेष कोर्स त्यांनी 25 ते 27 जुलै 2025 रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे तीन दिवसीय कोर्स पूर्ण केला आहे. या कोर्समध्ये समग्र कल्याण, ब्रह्माकुमारीज विचारधारा, ध्यान, प्रार्थना, अध्यात्मिक मूल्यांकन, समुपदेशन संवाद कौशल्य, आणि नैतिकता यांचा सखोल अभ्यास केला आहे.
          🔹 स्टुडन्ट सायकॉलॉजी सर्टिफिकेट कोर्स (ऑनलाईन) जुलै 2024  मध्ये डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सपकाळ फाउंडेशन व दूर्वा एज्युकेशन कौन्सिलिंग अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, डोंबिवली मार्फत हा कोर्स भारत सरकारच्या NITI आयोग, स्किल इंडिया, MSME व आयुष मंत्रालय यांच्या मान्यतेने पूर्ण केला आहे.

      अध्यात्मिक समुपदेशन – एक समाजहितार्थ दिशा.... आर. डी. पाटील सर आता "अध्यात्मिक समुपदेशक" या नात्याने समाजाच्या समोर येत असून, मानसिक व आध्यात्मिक आरोग्याच्या समतोलासाठी मार्गदर्शन करणार आहेत. ते शैक्षणिक संस्था, पालक, विद्यार्थी, युवक, महिला यांच्यासाठी वैयक्तिक आणि सामूहिक समुपदेशन सेवा देण्यास सज्ज आहेत.
            "मन, विचार आणि आत्म्याच्या एकात्मतेतूनच खरे आरोग्य आणि आनंद प्राप्त होतो," या विचारातून प्रेरित होऊन ते अध्यात्मिक समुपदेशनाचा उपयोग समाजघटकांच्या समग्र कल्याणासाठी करू इच्छित आहेत.

         त्यांना पुढील वाटचालीसाठी पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे , संचालक पंकज बोरोले , नारायण बोरोले, मुख्याध्यापक एम व्ही पाटील तसेच ब्रम्हाकुमारीज संस्थेचे विकास भाई ,पंकज भाई , डॉ. सोमनाथ वडनरे , चोपडा ओम शांती केंद्राच्या संचालिका मंगला दीदी , सारिका दीदी , शीतल दीदी , करिश्मा दीदी आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज