गणेश विसर्जन मिरवणूकीवर 100 सी सी टीव्ही कॅमेऱ्यांची नजर ; समाजात कुठल्याही प्रकारच्या तेढ निर्माण होणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही याची दक्षता गणेश भक्तांनी घ्यावयाची आहे - जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

25/08/2025

गणेश विसर्जन मिरवणूकीवर 100 सी सी टीव्ही कॅमेऱ्यांची नजर ; समाजात कुठल्याही प्रकारच्या तेढ निर्माण होणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही याची दक्षता गणेश भक्तांनी घ्यावयाची आहे - जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

           गणेश विसर्जन मिरवणूकीवर 100 सी सी टीव्ही कॅमेऱ्यांची नजर ; समाजात कुठल्याही प्रकारच्या तेढ निर्माण होणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही याची दक्षता गणेश भक्तांनी घ्यावयाची आहे - जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी

         समाजात कुठल्याही प्रकारच्या तेढ निर्माण होणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही याची दक्षता गणेश भक्तांनी घ्यावयाची आहे. जे कार्यकर्ते अतिउत्साहाच्या भरात शांतता भंग करत असतील अशांवर कडक कारवाईचा बडगा उगारला जाईल असा इशारा दिला.

        चोपडा शहरातील गणेश विसर्जन मिरवणूकीच्या मार्गावर 100 सी सी टीव्ही कॅमेऱ्यांची नजर प्रत्येकावर असून कोणीही गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीला गालबोट लागणार नाही असे कृत्य करू नये व गणपती बाप्पा ला शांततेत निरोप द्यावा असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी केले आहे. गेल्या बऱ्याच काळापासून चोपडा हे शांतताप्रिय शहर असल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला. चोपडा शहर पोलीस स्टेशनने नगरपालिका नाट्यगृहात गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद  2025 निमित्ताच्या आयोजित केलेल्या शांतता समिती बैठकीत ते बोलत होते.
          यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, चोपडा शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, ग्रामीण पोलीस निरीक्षक महेश टाक, मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्यासह चोपडा शहरातील हिंदू  व मुस्लिम बांधवांसह सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष, काही राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पोलिस अधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज