Post Top Ad
Responsive Ads Here
07/07/2025
Home
Unlabelled
विवेकानंद विद्यालयाचा 'ज्ञानबा-तुकाराम' चा जयघोष, बालवारकऱ्यांच्या दिंडीने यावल रोड परिसर दुमदुमला
विवेकानंद विद्यालयाचा 'ज्ञानबा-तुकाराम' चा जयघोष, बालवारकऱ्यांच्या दिंडीने यावल रोड परिसर दुमदुमला
चोपडा येथे गेले 26 वर्ष सातत्याने खंड पडू न देता आषाढी एकादशीचे औचित्य साधून येथील विवेकानंद विद्यालयाचा 'दिंडी सोहळा' भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात यावर्षी देखील साजरा करण्यात आला. विठ्ठल नामाच्या गजर, जय जय रामकृष्ण हरि व 'ज्ञानबा-तुकाराम'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. पारंपरिक वेशभूषेत सजलेले बालवारकरी या दिंडीचे प्रमुख आकर्षण ठरले. नारायण वाडी येथील विठ्ठल मंदिरापासून-देशमुख नगर-धनवाडी रोड-यावल रोड-विठ्ठल मंदिर या मार्गाने हा सोहळा संपन्न झाला. या दिंडी सोहळ्याची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, विश्वस्त व मुख्याध्यापक श्री.नरेंद्र भावे आणि श्री.पवन लाठी यांच्या हस्ते विठ्ठल मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांप्रमाणे पारंपरिक पोषाख परिधान केला होता. मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले होते, तर मुलांच्या हातात भगव्या पताका डौलाने फडकत होत्या. टाळ-मृदुंगाच्या तालावर अभंग गात आणि विठ्ठल नामाचा गजर करत निघालेली ही दिंडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. शाळेच्या प्रांगणातून निघालेली ही दिंडी पाहून प्रत्यक्ष पंढरीच्या वारीचा अनुभव उपस्थितांना आला. याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापक श्री. नरेंद्र भावे म्हणाले, "अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांना आपल्या महान संस्कृतीची आणि परंपरेची ओळख व्हावी, त्यांच्यावर सुसंस्कार घडावेत, या उद्देशाने दरवर्षी या दिंडीचे आयोजन केले जाते. "या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते, ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here





No comments:
Post a Comment