चोपडा तंत्रनिकेतनास 'उत्कृष्ट' (Excellent) मानांकन प्राप्त! - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

02/07/2025

चोपडा तंत्रनिकेतनास 'उत्कृष्ट' (Excellent) मानांकन प्राप्त!

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपडा तंत्रनिकेतनास 'उत्कृष्ट' (Excellent) मानांकन प्राप्त!

         महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून श्रीमती शरदच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजीनियरिंग अँड पॉलीटेक्निक) चोपडा यांना उत्कृष्ट मानांकनाचा दर्जा प्रदान करण्यात आला. तंत्रनिकेतनाच्या उन्हाळी सत्रात महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई च्या वतीने बाह्य आवेक्षण समिती पाहणी करण्याकरिता आली असता कमिटीने शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचे यश, प्रयोगशाळा सुविधा, अध्यापन गुणवत्ता, शैक्षणिक व्यवस्थापन, प्लेसमेंट, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा आणि त्यांचा होणारा पुरेपूर वापर या सर्व बाबींची पाहणी केली. त्या आधारावर चोपडा तंत्रनिकेतनाने सर्वच बाबींमध्ये उत्कृष्ट स्तर गाठला आहे असे अधोरेखित झाले. 

           “संस्थेचे अध्यक्ष मा. भैय्यासाहेब अँड संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव माननीय ताईसाहेब डॉ. स्मिता संदीप पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन, प्राध्यापक व इतर सहकार्यांचे सहकार्य यामुळेच श्रीमती शरदच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजीनियरिंग अँड पॉलीटेक्निक) चोपडा 'उत्कृष्ट' मानांकनाचा दर्जा गाठू शकला”

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp