परीक्षित चव्हाण पंकज पाटील
चोपडा (प्रतिनिधी) : - -
सेवा शिक्षक मंडळाचे 24 व्या वर्षाचे शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर....
5 सप्टेंबर शिक्षक दिना निमित्त दिल्या जाणाऱ्या जि .प. शिक्षक पुरस्कारां मध्ये साधारण 23 / 24 वर्षांपूर्वी जि.प.ने माध्यमिक विभागासाठी दिले जाणारे शिक्षक पुरस्कार बंद केले. तेव्हा त्या वर्षांपासून चोपडा येथील सेवाभावी शिक्षकांनी एकत्र येत सेवा शिक्षक मंडळामार्फत तालुक्यातील उपक्रमशील माध्यमिक शिक्षकांसाठी प्रोत्साहनपर " सेवा शिक्षक गौरव पुरस्कार " प्रदान करणे सुरू केले होते. सेवा शिक्षक मंडळ संस्थापक विलास पं. पाटील व ॲड.डी.पी. पाटील खेडीभोकरी यांच्या परिवारातर्फे मातोश्री स्व.शांताई व पिताश्री स्व.पी.के.पाटील यांच्या स्मरणार्थ 3 विभागात दिल्या जाणाऱ्या या सेवा शिक्षक मंडळाच्या 'शिक्षक गौरव ' पुरस्कारांचे हे 24 वे वर्ष असून या वर्षाचे पुरस्कारार्थी शिक्षक 1)श्री . परीक्षित निंबाजी चव्हाण , जि.प. प्राथमिक - कोळंबा ( प्राथमिक विभाग ) 2) श्री.पवन लाठी विवेकानंद माध्यमिक विद्यालय ( विषय शिक्षक माध्यमिक विभाग ) 3) श्री .पंकज छगन पाटील , शा. शि. पाटील माध्य. विद्या मंदिर चहार्डी ( संगीत विभाग )हे आहेत. दरवर्षी शिक्षक दिनी घोषणा व यथावकाश या सेवा शिक्षक गौरव पुरस्कारांचे वितरण केल्या जाणाऱ्या
या वर्षीच्या सेवा शिक्षक गौरव पुरस्कारांची ही घोषणा सेवा शिक्षक मंडळ संस्थापक सेवानिवृत्त मुख्या.विलास पाटील खेडीभोकरीकर, निवृत्त मुख्या.एच.बी.मोरे, निवृत्त पर्यवेक्षक साहेबराव पाटील, मुख्या.नरेंद्र भावे, मुख्या.मंगेश भोईटे, संजय बारी, योगेश चौधरी इ .सेवा शिक्षक मंडळ सदस्यांनी केली आहे .
WhatsApp
No comments:
Post a Comment