सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेतर्फे सातपुड्यात बीज रोपणाचे सलग अकरावे वर्ष.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

03/09/2025

सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेतर्फे सातपुड्यात बीज रोपणाचे सलग अकरावे वर्ष....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेतर्फे सातपुड्यात बीज रोपणाचे सलग अकरावे वर्ष....

         चोपडा तालुक्यात पर्यावरणीयदृष्ट्या समतोल राखण्यासाठी किमान 33 टक्के भू क्षेत्रावर वृक्ष आच्छादन असणे अत्यंत आवश्यक. परंतु सरासरी भारतातील हे प्रमाण 20 टक्क्यांच्या जवळपास आहे. वृक्ष घनता देखील दिवसेंदिवस विरळ होत चालली आहे. जंगलातील अवैध अतिक्रमणे , प्रचंड वृक्षतोड व गुरं चराई , मानव निर्मित वणवे, वृक्षतोडीच्या तुलनेत वृक्ष जगण्याचा कमी झालेला दर यासारख्या कारणांनी मोठ्या प्रमाणात सातपुडा पर्वत ओरबाडला गेला आहे. हा असमतोल कमी करण्याच्या प्रयत्नात येथील सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेतर्फे 31 ऑगस्ट रोजी बीजरोपण करण्यात आले.
         बोरअजंटी वन क्षेत्रात (कक्ष क्रमांक 236) देशी वृक्ष संपदेचे 1100 + पेक्षा अधिक  बीजरोपण करण्यात आले. विविध प्रकारच्या बीजांचे संकलन व उपलब्धी वने , वन्यजीव व पक्षी संवर्धक हेमराज पाटील यांनी करून केली. सन 2015 पासून बीज रोपण व वृक्षारोपणाचे सलग अकरावे वर्ष असून वनक्षेत्रात हिरवळ वाढविण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. लावलेल्या बिजांचे रूपांतर दमदार वाढलेल्या रोपांमध्ये आढळून येत आहे. या निसर्ग सेवेसाठी चोपडा उप वनविभाग सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

============================

 

        बीजारोपण - श्री हेमराज पाटील , घनश्याम वैद्य ,आर्यदीप पाटील , दिनेश कोळी यांनी केले.

============================

          करंज , शिवण , नीम , खैर , बेल , आवळा , रामफळ , सिताफळ , चिंच , जांभूळ , आंबा ,अमलतास इत्यादी या स्थानिक वृक्षप्रजाती बीजांचे रोपण झाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज