चोपडा (प्रतिनिधी) : - -
महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने चोपडा तालुक्यात सेवा पंधरवडा तीन टप्प्यात राबविणार - तहसीलदार भाऊसाहेब थोरात
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत शासनाच्या आदेशाने राबविण्यात सेवा पंधरवड्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती पत्रकार परिषद घेऊन सर्व पत्रकारांना दिली. या सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत शासनाच्या सर्व योजना आणि उपक्रमांचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार चोपडा तालुक्यात सेवा पंधरवडा कार्यक्रम तीन टप्प्यात राबविण्याचे नियोजन केले असल्याची माहिती चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी आज तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या तीन टप्प्यांमध्ये तालुक्यातील महसूल थकबाकी मुक्ती मोहीम, शासनाच्या सामाजिक अर्थ साहाय्य योजना, बंद झालेले रेशन कार्ड जिवंत करणे, सातबारा जिवंत मोहीम, शेतसाठी सुलभ योजना, शेत जमीन वर्ग 2 चे वर्ग 1 रूपांतर योजना, पानंद रस्ते, स्मशानभूमी योजना, छत्रपती शिवाजी महाराज महासमाधान शिबिर, शेतकरी आत्महत्या कुटुंबाला लाभ देणे, महाविद्यालयीन शिबिरात विध्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्र वाटप या योजनांचा लाभ देण्याचे सेवा पंधरवड्यात नियोजन असल्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी पत्रकार परिषदेत तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार योगेश पाटील, तालुक्यातील पत्रकार बांधव तसेच तहसील कार्यालयातील सर्व विभागातील कर्मचारी हजर होते.
WhatsApp
No comments:
Post a Comment