चोपडा तालुकास्तरीय विज्ञान नाटयोत्सव स्पर्धा उत्साहात संपन्न.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

11/09/2025

चोपडा तालुकास्तरीय विज्ञान नाटयोत्सव स्पर्धा उत्साहात संपन्न....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपडा तालुकास्तरीय विज्ञान नाटयोत्सव स्पर्धा उत्साहात संपन्न....

         चोपडा शिक्षण विभाग, पंचायत समिती चोपडा व चोपडा तालुका विज्ञान मंडळ व महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान" या विषयांतर्गत पाच उपविषयांवर आधारित तालुकास्तरीय विज्ञान नाटयोत्सव स्पर्धा आज 11 सप्टेंबर रोजी संपन्न झाली. सदर स्पर्धा दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाच्या अनुसयाबाई सभागृहात घेण्यात आली. या नाटयोत्सवात चोपडा तालुक्यातील एकूण 13 शाळांनी सहभाग नोंदवला.

          या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी मा.श्रीमती कविता सुर्वे होत्या. स्पर्धकांना "मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान" याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. परीक्षक म्हणून श्री. गौरव प्रकाश महाले (संचालक,शारदा मॅथ परिवार) तसेच श्री जी. बी.पाटील (माध्य. शिक्षक, हातेड) यांनी कामकाज पाहिले. यावेळी मंचावर गटशिक्षणाधिकारी श्रीमती कविता सुर्वे, प्रशांत सोनवणे, मुख्याध्यापक एन. एस.सोनवणे, तालुका विज्ञान मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव श्रीमती विजया पाटील, संजय सोनवणे (संचालक, माध्यमिक पतपेढी, जळगाव), सहसचिव निलेश पाटील, प्रसिद्धीप्रमुख रुपेश नेवे, सदस्य किशोर पाटील व श्रीमती एस. एम. चौधरी हे तालुक्यातील विज्ञान शिक्षक उपस्थित होते.
          या विज्ञान नाटयोत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक भाविका राजेंद्र पाटील व समूह  (कस्तुरबा माध्यमिक विद्यालय, चोपडा) यांनी पटकावला व त्यांची निवड जिल्हास्तरावर  झाली आहे. द्वितीय क्रमांक सुदिक्षण सतीश पाटील व समूह (पंकज माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, चोपडा) तृतीय क्रमांक अनुज सुधीर पाटील व समूह (भाऊसो. शा शि. पाटील विद्यामंदिर, चहार्डी) व उत्तेजनार्थ साक्षी बाळू कोळी व समूह (महात्मा गांधी विद्यालय,चोपडा) व नक्षत्र सागर धनगर व समूह (विवेकानंद विद्यालय,चोपडा) यांनी संयुक्तिकरित्या पटकावला. कार्यक्रमाच्या शेवटी परीक्षक मनोगत श्री. गौरव महाले  यांनी व्यक्त केले. 

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सोनवणे, प्रास्ताविक संजय पाटील व आभार भूपेंद्र पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महात्मा गांधी विद्यालय विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. एस. सोनवणे, संजय सोनवणे, दिनेश बाविस्कर, विज्ञान मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख रुपेश नेवे, एस.एच. पाटील, श्रीमती एस. एस. बारेला, श्रीमती एच.डी. शहा, श्रीमती एस. एम. सुरवाडे, ए.आर. महाजन, श्रीमती नूतन चौधरी, श्रीमती के. ए. महाजन श्रीमती एस. एम. चौधरी, पी एस पाटील, पंकज पाटील व शिक्षण विभाग, चोपडा व विज्ञान मंडळाचे पदाधिकारी तसेच सर्व सहकारी शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp