कठोरा ग्रामपंचायतीकडून घरकुल जागावाटपात विलंब ; भीम आर्मीची आमरण उपोषणाची चेतावणी - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

30/10/2025

कठोरा ग्रामपंचायतीकडून घरकुल जागावाटपात विलंब ; भीम आर्मीची आमरण उपोषणाची चेतावणी

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          कठोरा ग्रामपंचायतीकडून घरकुल जागावाटपात विलंब ; भीम आर्मीची आमरण उपोषणाची चेतावणी

       कठोरा ता. चोपडा, जि. जळगाव येथील आदिवासी, निराधार, बेघर व भूमिहीन नागरिकांना शासनाच्या घरकुल योजने अंतर्गत घरकुल बांधकामासाठी जागावाटप करण्यात यावी, या मागणीसाठी भीम आर्मी भारत एकता मिशन तर्फे ग्रामपंचायत कठोरा , गटविकास अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष मुबारक नजबुल तडवी तसेच जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, माहिती अधिकार कार्यकर्ता व पत्रकार राहुल जयकर यांच्या स्वाक्षऱ्या असून, शासनाच्या मालकीची जमीन तातडीने पात्र लाभार्थ्यांना देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

          अर्जदारांनी निवेदनात नमूद केले आहे की, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद जळगाव यांच्या आदेशानुसार घरकुलासाठी जमीन वाटपाची कार्यवाही करण्यास ग्रामपंचायतींना सूचित करण्यात आलेले आहे. तरी देखील ग्रामपंचायत कठोरा येथे संबंधित कार्यवाही करण्यात होत असलेला विलंब हा अन्यायकारक व शासन विरोधी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
           तसेच येत्या सात दिवसांत जर जागा वाटपाची कार्यवाही न केल्यास, भीम आर्मी भारत एकता मिशन तर्फे पंचायत समिती कार्यालय, चोपडा येथे अन्नत्याग आमरण उपोषण सुरू करण्यात येईल अशी चेतावणी देण्यात आली आहे. या आंदोलनातून उद्भवणाऱ्या सर्व परिणामांसाठी ग्रामसेवक सौ. मनीषा महाजन, सरपंच एकनाथ कोळी आणि ग्रामपंचायत सदस्य यांना जबाबदार धरले जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

          या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा मुख्याधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना पाठविण्यात आली आहे. ग्रामीण भागातील भूमिहीन आणि बेघर नागरिकांच्या समस्येला न्याय मिळावा, या हेतूने दिलेले हे निवेदन प्रशासनास जाग आणणारे ठरेल, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp