चोपडा शहरात नोव्हेंबरमध्ये जनगणनेची पूर्वचाचणी ; शहरातील नागरिकांनी स्वगणनेत सहकार्य करावे - जिल्हाधिकारी व तहसीलदार यांचे आवाहन.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

30/10/2025

चोपडा शहरात नोव्हेंबरमध्ये जनगणनेची पूर्वचाचणी ; शहरातील नागरिकांनी स्वगणनेत सहकार्य करावे - जिल्हाधिकारी व तहसीलदार यांचे आवाहन....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपडा शहरात नोव्हेंबरमध्ये जनगणनेची पूर्वचाचणी ; शहरातील नागरिकांनी स्वगणनेत सहकार्य करावे - जिल्हाधिकारी व तहसीलदार यांचे आवाहन....

         भारत सरकारने जनगणना 2027 ची तयारी म्हणून देशभर पूर्वचाचणी (Pre-Test) सुरू केली असून, महाराष्ट्र राज्यातील निवडक जिल्ह्यांमध्ये तिची अंमलबजावणी होणार आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याचा निवडक क्षेत्रांचा समावेश आहे. ही पूर्वचाचणी 20 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत घेतली जाणार असून या काळात जनगणनेशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी घराघरात भेट देऊन माहिती संकलन करणार आहेत.

          राज्य शासनाने नुकत्याच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी जळगाव यांना प्रमुख जनगणना अधिकारी, तर तहसीलदार चोपडा यांना चार्ज अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.

        तसेच स्वगणनेचा पर्याय उपलब्ध आहे. नागरिकांना आपल्या मोबाईलद्वारे किंवा संगणकावरून स्वतःची माहिती भरता यावी म्हणून स्वगणना (Self Enumeration) ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. 20 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान www.censusindia.gov.in या संकेतस्थळावर स्वगणना फॉर्म भरता येईल.
🔹 नागरिकांनी घरातील सर्व सदस्यांची माहिती अचूकपणे द्यावी.

🔹 अधिकृत जनगणना कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.

🔹 स्वगणना करताना आवश्यक माहिती (जसे की आधार क्रमांक, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, व्यवसाय, घराचे तपशील इ.) जवळ ठेवावी.

 🔹 मिळालेला स्वगणना क्रमांक अधिकाऱ्यांना दाखवावा.

          जिल्हाधिकारी जळगाव (प्रमुख जनगणना अधिकारी) व तहसीलदार चोपडा (चार्ज अधिकारी) यांनी चोपडा तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, जनगणना ही देशाच्या नियोजनाची पायाभूत प्रक्रिया आहे. शासनाच्या विकास योजनांसाठी अचूक आकडेवारी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक घराने आणि नागरिकाने या पूर्वचाचणीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा व स्वगणनेत सहकार्य करावे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp