नगरपरिषदेच्या निवडणुकी साठी मतदानाला जाताना निवडणूक ओळखपत्रासह 12 पुरावे ग्राह्य... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

29/11/2025

नगरपरिषदेच्या निवडणुकी साठी मतदानाला जाताना निवडणूक ओळखपत्रासह 12 पुरावे ग्राह्य...

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         नगरपरिषदेच्या निवडणुकी साठी मतदानाला जाताना निवडणूक ओळखपत्रासह 12 पुरावे ग्राह्य...

       चोपडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करीता दि. 02/12/2025 रोजी मतदान होणार असून मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटवण्यासाठी निवडणूक आयोगाचे ओळखपत्र आणि त्याव्यतिरिक्त भारतीय पारपत्र (पासपोर्ट), आधार ओळखपत, वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅन कार्ड, केंद्र शासन, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना फोटोसहीत दिलेली ओळखपत्रे, राष्ट्रीयकृत बँक अथवा पोस्ट ऑफिस यामधील खातेदाराचे फोटो असणारे पासबूक, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाचे फोटो असलेले दस्तावेज अथवा पासबूक, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरीत केलेले अधिकृत ओळखपत्र, स्वातंत्र्यसैनिकांचे फोटो असलेले ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरीत आरोग्य विमा स्मार्ट कार्ड असे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. मतदारांनी मतदान केंद्रावर जातांना मतदार माहिती चिड्डी आणि मतदार ओळखपत्र आणि वरील 12 पैकी कोणतीही एक मूळ पुरावा सोबत घेऊन जाने आवश्यक आहे.
          तसेच मतदान कक्षात मोबाईल नेण्यास बंदी असेल.
       चोपडा शहरातील संभाव्य दुबार मतदार यादीमध्ये नाव आलेल्या ज्या मतदारांनी आपला परिशिष्ट एकचा फॉर्म भरून दिला आहे त्यांना त्यांच्या पसंतीक्रमाच्या प्रभागामधील मतदान केंद्रावर मतदान करता येईल. याची कृपया संबंधित मतदारांनी नोंद घ्यावी. तसेच यासाठी नगरपरिषदेत मतदार सहायता कक्ष निर्माण करण्यात आला आहे याची आवश्यकता असेल तर मदत घ्यावी.
        याचप्रमाणे दिव्यांग वयोवृद्ध मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम व व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी माहिती दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज