चोपडा (प्रतिनिधी) : - -
चोपडा नगरपरिषदचे शांततेत मतदान पार... 67•97% मतदान, निकाल - 21डिसेंबर ; मतदान जनजागृती सह आदर्श मतदान केंद्र उभारणी...
चोपडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत आदर्श मतदान केंद्र उभारणीसह मतदारांना सुसज्ज सुविधांची हमी व जनजागृती संदेश निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी रामनिवास झंवर, तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनातून चोपडा नगरपरिषद सार्वत्रिक निवणूकीच्या : पार्श्वभूमीवर मतदारांना सुरक्षित, सुलभ आणि प्रेरणादायी मतदानाचा अनुभव देण्यासाठी चोपडा शहरातील निवडणूक विभागातील मतदार जनजागृती अभियान अंतर्गत एकूण 3 ठिकाणी आदर्श मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली. यामध्ये नगरपरिषदेच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले म्युनिसिपल हायस्कूल, प्रताप विद्या मंदिर, मेमोसा विद्यालय यांचा समावेश होता. यामध्ये प्रताप विद्या मंदिर येथे पिंक बुथ च्या संकल्पनेतून आजची आधुनिक स्त्री ही थिम मांडण्यात आली होती. तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले म्युनिसिपल हायस्कूल येथे प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती व्हावी याकरीता विविध कटआऊट व प्लास्टिक बंदीबाबतचे संदेश देणारे बॅनर व बलुन डेकोरेशन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे मेमोसा विद्यालय याठिकाणी स्वच्छ भारत अभियान बाबतची जनजागृती करणारी सजावट करण्यात आली होती. तसेच मतदारांची सोय, प्रोत्साहन व जागरूकता यांना प्राधान्य देत सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशी मतदान केंद्रे यंदा मतदारांचे लक्ष वेधून घेत होते. आदर्श मतदान केंद्रात स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, व्हीलचेअर व्यवस्था, रॅम्प, सावली निवारा, तसेच प्राथमिक मदत कक्ष यांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान करणाऱ्या मतदारास पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. मतदान केंद्र परिसर आकर्षक सजावटीने सुशोभित करण्यात आले असून मतदान-जागृती संदेश, फुलांची सजावट, सेल्फी पॉइंट आदी उपक्रमांमुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत होते.
निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी सांगितले की, “मतदारांचा सहभाग वाढवणे, त्यांना सकारात्मक मतदानाचा अनुभव देणे आणि सर्वांसाठी सुलभ व सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे आदर्श मतदान केंद्राचे मुख्य उद्दिष्ट आहे.” तसेच सहा.निवडणूक निर्णय अधिकारी रामनिवास झंवर यांनी मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने केंद्रावर उपस्थित राहून "लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे" आवाहन करण्यात आले होते. तसेच याकरीता मतदार जनजागृती अभियान कक्ष यांनी विशेष यांनी परिश्रम घेतले. आज चोपडा शहरात सर्व 15 प्रभागात शांततेत मतदान पार पडले असून 31 नगरसेवक व लोकनियुक्त नगराध्यक्ष अश्या 32 लोकप्रतिनिधीचे भवितिव्य बंद झाले.
चोपडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मतदानाची आकडेवारी
पुरुष - 22819 ... स्त्रिया - 22490 ... इतर - 2
एकुण मतदान - 45311 ... 67 • 97%
आता प्रतीक्षा 21डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीची, मुंबई उच्चन्यायालत यासंदर्भात लागलेल्या निकाला नुसार निवडणूक आयोगाच्या निर्णयाने आता सर्व नगरपरिषद / नगरपंचायत यांची मतमोजणी व निकाल 21 डिसेंबर ला होईल.
WhatsApp
No comments:
Post a Comment