महात्मा गांधी माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

31/12/2025

महात्मा गांधी माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          महात्मा गांधी माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे....

         चोपडा तालुक्यातील लासूर येथील महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले.  माध्यमिक विभागातील 72 तर उच्च माध्यमिक विभागातील 22 विद्यार्थ्यांनी आपले कलागुण  सादर केलेत. विद्यार्थ्यांमधील वेगवेगळ्या कला गुणांनी प्रेक्षकांना चार तास जागेवरच खिळवून ठेवले. 
        याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर स्त्री प्रेक्षकवर्ग उपस्थित होता. विविध देशभक्तीपर नृत्य गीतांनी व ऐतिहासिक प्रसंग दाखवणाऱ्या गीतांनी प्रेक्षकांना मोहित करून सोडले. विनोदी नाटक गुडघ्याला बाशिंग यामुळे प्रेक्षकांचे हसू अनावर झाले तर वृद्धाश्रम मुक्त भारत अभियानावर आधारित नाटक स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी यामुळे प्रेक्षकांचे आसू अनावर झालेत. या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अनिल हिम्मतराव पाटील यांनी केले यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश फुलचंद सुराना सचिव विक्रम रामदास माळी व सर्व कार्यकारी संचालक मंडळ उपस्थित होते.
         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य आर एस पाटील, उपप्राचार्य आर एल बाविस्कर, पर्यवेक्षक एस जी पाटील तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माराम महाजन व रजिया तडवी मॅडम यांनी केले. अशा उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो तसेच त्यांच्या मानसिक, बौद्धिक व शारीरिक विकास घडून येतो. आजचे विद्यार्थी हे देशाचे उज्वल भविष्य असून शिक्षणासोबत कला , क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात संधी मिळाल्यास ते सुदृढ नागरिक बनतील. यावेळी गावातील विविध संस्थातील पदाधिकारी, पत्रकार मंडळी, पालक वर्ग, व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp