नववर्षाच्या प्रथमदिनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. नम्रता सचिन पाटील पदभार स्वीकारणार.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

31/12/2025

नववर्षाच्या प्रथमदिनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. नम्रता सचिन पाटील पदभार स्वीकारणार....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         नववर्षाच्या प्रथमदिनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. नम्रता सचिन पाटील पदभार स्वीकारणार....

        चोपडा शहरात पहिल्यांदाच चोपडा नगरपालिकेत शिवसेनेचे नगराध्यक्ष विराजमान होणार असून सौ.नम्रता सचिन पाटील आतापर्यंतच्या सर्वात तरुण नगराध्यक्षा आहेत. त्या 1 जानेवारी रोजी नगराध्यक्षा पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. या पदग्रहण सोहळ्याची सुरुवात 1 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेता चोपड्याचे जागृत देवस्थान मुजुमदार गणपती मंदिराचे दर्शन घेऊन वाजत गाजत नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष व सर्व शिवसेनेचे नगरसेवक, सर्व पदाधिकारी - कार्यकर्ते यांच्यासह होणार आहे.

         या कार्यक्रमाला आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आ. लताताई चंद्रकांत सोनवणे आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड संदीप पाटील, डॉ. स्मिता पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा संपन्न होणार त्याप्रसंगी नम्रता पाटील यांचे पती सचिन पाटील, सासरे रवींद्र पाटील, विकास पाटील तसेच शिवसेना - शिंदेगटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह नवनियुक्त नगरसेवक आणि चोपडा नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामनिवास झवर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित असणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp