पंकज बालसंस्कार केंद्रात ‘वाटाण्याच्या शेंगा निवडणे’ उपक्रमातून बालकांमध्ये स्वावलंबनाचा विकास - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

21/01/2026

पंकज बालसंस्कार केंद्रात ‘वाटाण्याच्या शेंगा निवडणे’ उपक्रमातून बालकांमध्ये स्वावलंबनाचा विकास

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         पंकज बालसंस्कार केंद्रात ‘वाटाण्याच्या शेंगा निवडणे’ उपक्रमातून बालकांमध्ये स्वावलंबनाचा विकास

         चोपडा येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज बालसंस्कार केंद्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘वाटाण्याच्या शेंगा निवडणे’ हा जीवनोपयोगी उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. आनंददायी, हसत-खेळत आणि कृतीयुक्त शिक्षण या तत्त्वावर आधारित या उपक्रमामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील कामांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

          या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची भावना रुजविण्याबरोबरच बोटांच्या स्नायूंचा विकास, सूक्ष्म हालचालींचा सराव, निरीक्षण क्षमता व एकाग्रतेत वाढ झाली. तसेच प्रत्यक्ष अनुभवातून शिकल्यामुळे विद्यार्थ्यांची आकलनशक्ती अधिक सक्षम झाली. मुलांनी आनंदाने व उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला.

        या उपक्रमाचे मार्गदर्शन मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील सर व विभागप्रमुख सौ. मीना माळी मॅडम यांनी केले. सर्व शिक्षिका व कर्मचारी वृंदाच्या सहकार्यामुळे उपक्रम यशस्वी ठरला. अशा जीवनोपयोगी उपक्रमांमुळे बालकांचा शारीरिक, बौद्धिक व भावनिक विकास घडून येत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp