नवनिर्वाचित नगरसेवक पंकज बोरोले यांचा कामाचा धडाका..... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

10/01/2026

नवनिर्वाचित नगरसेवक पंकज बोरोले यांचा कामाचा धडाका.....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         नवनिर्वाचित नगरसेवक पंकज बोरोले यांचा कामाचा धडाका.....

         चोपडा नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) तर्फे वॉर्ड क्रमांक 15 मधून प्रचंड बहुमताने निवडून आलेले नगरसेवक पंकज बोरोले, श्रीमती वंदनाताई पाटील व श्रीमती वैशालीताई पवार यांनी पदभार स्वीकारताच जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत आपल्या कामाची प्रभावी सुरुवात केली आहे.

         पदभार स्वीकारल्या नंतर परिस पार्क कॉलनीतील एका समस्येबाबत शेखर शिरसाठ यांनी नगरसेवक पंकज बोरोले यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कॉलनीत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शहरात सुरू असलेल्या अंडरग्राऊंड गटारीच्या कामानंतर नागरिक अनेक दिवसांपासून काँक्रिट रस्त्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र रस्त्याच्या कामाआधी आवश्यक असलेल्या नळ कनेक्शनमध्ये पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन ही गटाराच्या पाइपच्या खाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

        नुकत्याच इंदूर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही बाब गंभीर असल्याचे ओळखून नगरसेवक पंकज बोरोले यांनी तत्काळ संबंधित पाइपलाइनचे फोटो घेतले व नगरपालिका कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. कार्यालयीन वेळ संपली असतानाही कर्मचाऱ्यांनी थांबून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. सातत्यपूर्ण पाठपुराव्या नंतर नवीन व सुरक्षित पाइपलाइन टाकण्याची व्यवस्था करण्यात आली.

        या कामाचे उद्घाटन करताना नगरसेवक पंकज बोरोले यांनी सर्व कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत तसेच कुठेही दिरंगाई होऊ नये अशा स्पष्ट सूचना दिल्या. त्यांच्या तत्परतेमुळे व कामाच्या पद्धतीमुळे कॉलनीवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून तरुण, तडफदार नेतृत्वाला संधी दिल्याबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

        यावेळी कॉलनीवासीयांच्या वतीने नगरसेवक पंकज बोरोले व सुमित पाटील यांचा शेखर शिरसाठ यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास नंदकिशोर सांगोरे, मुन्ना साळुंखे, अनिल सोनवणे, विजयकुमार देसले, गोपाल सोनवणे, मच्छिंद्र कोळी, चंद्रकांत बाविस्कर सर, किशोर पाटील, उदय बोरसे, दीपक चौधरी, जितेंद्र महाजन सर आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp