नगराध्यक्षा क्रीडा महोत्सवांतर्गत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन..... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

08/01/2026

नगराध्यक्षा क्रीडा महोत्सवांतर्गत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन.....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         नगराध्यक्षा क्रीडा महोत्सवांतर्गत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन.....

         चोपडा नगरपरिषद, चोपडा यांच्या वतीने नगराध्यक्षा क्रीडा महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले असून, या क्रीडा महोत्सवांतर्गत विविध क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. या संदर्भात यापूर्वी निर्गमित आदेश/परिपत्रकाच्या अनुषंगाने सदर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. नगराध्यक्षा क्रीडा महोत्सवांतर्गत बॉक्स क्रिकेट, खो-खो, कबड्डी, कॅरम, बॅडमिंटन, चेस, रिंगसेव, जलद चालणे (3 कि.मी.) तसेच व्हॉलीबॉल आदी विविध क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. 

       सदर स्पर्धा जानेवारी 2026 दरम्यान वेगवेगळ्या तारखांना आयोजित करण्यात येणार असून, प्रत्येक स्पर्धेसाठी जबाबदार अधिकारी/कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ठरविण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार दिनांक 13 जानेवारी ते 23 जानेवारी 2026 या कालावधीत विविध क्रीडा स्पर्धा पार पडणार आहेत. सर्व स्पर्धा पारदर्शक, शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे.
         नगराध्यक्षा क्रीडा महोत्सवाचा मुख्य उद्देश नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांमध्ये क्रीडासंस्कृती वृद्धिंगत करणे, आरोग्यविषयक जनजागृती करणे व संघभावना निर्माण करणे हा आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चोपडा नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp