उभारलेले सुंदर मुख्य प्रवेशद्वार हे चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या उत्कृष्ठ कामांचा आरसा - - अरुणभाई गुजराथी यांचे प्रतिपादन - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

08/01/2026

उभारलेले सुंदर मुख्य प्रवेशद्वार हे चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या उत्कृष्ठ कामांचा आरसा - - अरुणभाई गुजराथी यांचे प्रतिपादन

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         उभारलेले सुंदर मुख्य प्रवेशद्वार हे चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या उत्कृष्ठ कामांचा आरसा - - अरुणभाई गुजराथी यांचे प्रतिपादन

        चोपडा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष रमणलाल बाबुलाल गुजराथी यांच्या सौजन्याने उभारलेल्या ज्येष्ठ नागरिक संघ चोपडाच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य कार्यशाळा असा दुहेरी कार्यक्रम नुकताच चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या 34 व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर संपन्न झाला. यावेळी जिल्ह्यासह खानदेशातील उत्कृष्ट कार्य करणारा संघ म्हणून गौरविल्या गेलेल्या चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या आतापर्यंतच्या एकूण कामांचा, संघ आवारातील विविध सुविधांचा गौरवाने उल्लेख करीत संघ आवाराचे सुंदर प्रवेशद्वार व त्याचे रमणलाल बाबुलाल गुजराथी नामकरण फलकाचे उद्घाटन करतांना वरील शब्दांत माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्याचा गौरव केला. 

          कार्यक्रमाच्या प्रारंभी सोहळा अध्यक्ष श्री.डी.टी.चौधरी (माजी अध्यक्ष फेस्कॉम नेरळ मुंबई) जळगांव, उद्घाटक माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, प्रवेशद्वार बांधकाम दाते रमणलाल बाबुलाल गुजराथी, प्रमुख वक्ते अरुण रोडे (माजी अध्यक्ष फेस्कॉम नेरुळ - मुंबई) पुणे तसेच डॉ.मिलींद सरदार (माधव बाग कार्यक्रम समन्वयक) प्रमुख पाहुणे जगतराव पाटील (माजी अध्यक्ष - खान्देश प्रादेशिक विभाग,धुळे) ॲड.व्ही.बी.पाटील, माजी तहसिलदार अरुण डी. माळी (अध्यक्ष - खान्देश प्रादेशिक विभाग धुळे) एरंडोल, एस.बी. महाजन रावेर (अध्यक्ष - ज.जि. समन्वय समिती) ॲड.अरुण धांडे सहसचिव - खा.प्रा.विभाग धुळे, बाळकृष्ण वाणी (उपाध्यक्ष फेस्कॉम व मनो हारी युवा संपादक), विजय एच. करोडपती (जिल्हा अध्यक्ष -  पश्चिम विभाग समन्वय समिती), चोपडा नगरीचे आरोग्यदूत डॉ.विकास हरताळकर, राष्ट्रीय कॉग्रेस राज्य उपाध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयदेव निंबाजी देशमुख, न.प. चोपडाचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर, न.प. चोपडाचे श्री. गायकवाड या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
         तसेच मान्यवर व प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतानंतर प्रमुख वक्ते अरुण माधवराव रोडे यांनी ज्येष्ठांसाठीच्या केंद्राचे व राज्याचे धोरण - विविध योजना, ज्येष्ठांसाठीचे कायदे त्यांचे ज्येष्ठांसाठीचे फायदे यावर माहिती दिली, ॲड.व्ही. बी. पाटील यांनी वृद्धांसाठी कायदा 2007 कायदे व अंमल बजावणी 2010 या विषयावर थोडक्यात मुद्देसूद मार्गदर्शन केले, तर आरोग्य कार्यशाळेत ज्येष्ठांना परावलंबित्व टाळण्यासाठी माहितीपर मार्गदर्शन करतांना मुख्य आहार, विहार , विचार, यांच्या योगातून मीच माझ्या सन्मानाचा शिल्पकार हा विचार प्रत्यक्षात उतरेल असे डॉ.मिलींद सरदार यांनी प्रतिपादन केले. यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, सात्विक विचारांसह स्वच्छंदी मानसिकता ठेवून आपण स्वतः ला बदलले व कोणाशी स्पर्धा करायची नाही असं ठरवून अहंकार सोडला पाहिजे असा विचार त्यांनी मांडला. शेवटी अध्यक्षीय मनोगतात कार्यक्रम अध्यक्ष श्री.डी.टी.चौधरी (माजी अध्यक्ष फेस्कॉम नेरळ - मुंबई) जळगांव यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या विविध शाखांच्या जबाबदाऱ्या व त्यांनी करावयाची कामे यांविषयी मार्गदर्शन करीत शासनाची मदत मिळणाऱ्या ज्येष्ठांसाठीच्या विरंगुळा केंद्राच्या उभारणी कडे लक्ष द्यावे असे आग्रही प्रदिपादन केले.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघ अध्यक्ष जयदेव देशमुख, सूत्रसंचालन संघ सचिव विलास पाटील सर खेडीभोकरीकर, प्रमुख पाहुणे परिचय फेस्कॉम तालुका सचिव शांताराम जे. पाटील व आभार सहसचिव इंजि. विलास एस्. पाटील यांनी मानलेत. ज्येष्ठांसाठीच्या या सुंदर, देखण्या व नियोजनबद्ध कार्यक्रमास जिल्हयातीत विविध ज्येष्ठ नागरिक संघ तालुका समन्वय समितींचे पदाधिकारी , प्रतिनिधी व संघ सदस्य अशी सुमारे 150 च्या वर बंधू - भगिनींची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रम आयोजन यशस्वी करणे कामी संघाचे उपाध्यक्ष जे.एस.नेरपगारे, संघ कोषाध्यक्ष दिलीपराव माधवराव पाटील, फेस्कॉन जिल्हा संघटक प्रमोद डोंगरे, ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य सर्वश्री प्रा.श्याम गुजराथी, गोविंदा महाजन, राजेंद्र साळुंखे, प्रा.एस.एम.पाटील, गोकुळ पाटील, पेंढारकर, एन.डी. महाजन, संजय बजाज, रामकृष्ण माळी यांच्यासह संघ सदस्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज