महाशिवलिंगाचा दर्शन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

15/02/2026

महाशिवलिंगाचा दर्शन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न....

 


चोपडा (प्रतिनिधी) : - -

         महाशिवलिंगाचा दर्शन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न....

       महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय चोपडा यांच्या वतीने साकारण्यात आलेल्या 18 फूट उंच भव्य महाशिवलिंगाचा दर्शन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 21,111 कच्च्या केळ्यांपासून पर्यावरणपूरक पद्धतीने तयार करण्यात आलेले हे शिवलिंग भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

         महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र व श्रद्धेचा उत्सव मानला जातो. निराकार परमात्मा शिव यांच्या अवतरणाचा स्मरणदिन म्हणून या पर्वाचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले जाते. अज्ञानातून ज्ञानाकडे, अंध:कारातून प्रकाशाकडे आणि अशांततेतून शांततेकडे नेणारा हा उत्सव आत्मचिंतन, संयम, पवित्रता व सद्भावना जागृत करणारा आहे.

         या भक्तिमय कार्यक्रमाच्या दर्शन सोहळ्याचे उद्घाटन डॉ. विकास हरताळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा.अरुणभाई गुजराथी, नगराध्यक्षा नम्रता पाटील,डॉ. विनीत हरताळकर, डॉ सुरेश बोरोले, डॉ पवन पाटील, हेमलता बोरोले, ॲड. निर्मल देशमुख, राजूभाई शर्मा, चंदुलाल पालीवाल, तसेच ओम शांती केंद्राच्या संचालिका मंगला दिदी, सारिका दिदी, शितल दिदी, करिश्मा दिदी आदी मान्यवर उपस्थित होते.

         सदर शिवलिंग तयार करण्यासाठी सेवाधारी राजू अण्णा पाटील, पंकज भाई, महेंद्र भोळे, डॉ. ईश्वर बोरसे, यशवंत चौधरी, कुणाल भाई, घनश्याम भाई, वसंत भाई, शिवाजी पाटील, जयेश पाटील, सौरभ भोळे तसेच कांचन भोळे, वंदना पाटील, उषा बोरसे, शुभांगी कापूरे, कल्पना पाटील, अनिता पाटील, नीलिमा पाटील, निर्मला पाटील, रजनी बाविस्कर, योगिता कोळी, मनिषा पाटील, सविता पाटील, संध्या पाटील, शैला शिंदे आदींचा सहभाग उल्लेखनीय होता.

         हा उपक्रम प्रभू चिंतन भवन, ओम शांतीनगर, यावल रोड येथे 15 ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत भाविकांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता व रात्री 7 वाजता आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच आध्यात्मिक चित्रप्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले असून, त्यातून शिवतत्त्वाचे गूढ, आत्मा–परमात्म्याचे नाते आणि सदाचारयुक्त जीवनाची दिशा स्पष्ट केली जात आहे. 

         सदर शिवलिंग चार दिवस दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले असून, जास्तीत जास्त भाविकांनी सहपरिवार उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा व परमात्म्याचा दिव्य संदेश आत्मसात करावा, असे आवाहन ओम शांती केंद्राच्या संचालिका मंगला दिदी यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp