पं. दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठातर्फे अनिल पालीवाल यांना पीएच.डी पदवी प्रदान..... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...
ताज्या बातम्या
मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)    |    बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288    |    निष्पक्ष आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा S Maharashtra 7 News...

Post Top Ad

Responsive Ads Here

14/02/2026

पं. दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठातर्फे अनिल पालीवाल यांना पीएच.डी पदवी प्रदान.....


चोपडा (प्रतिनिधी) : - -

          पं. दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठातर्फे अनिल पालीवाल यांना पीएच.डी पदवी प्रदान.....

        नवी दिल्ली येथे 60 विद्वानांचा ‘विद्या वाचस्पती’, ‘सारस्वत सन्मान’ देऊन केला गौरव हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या पं. दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ, वृंदावन धाम (मथुरा) यांच्या वतीने 1 फेब्रुवारी रोजी देशाची राजधानी नवी दिल्ली येथे भव्य राष्ट्रीय हिंदी संगोष्ठी व ‘विद्या वाचस्पती’ सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नवी दिल्लीतील पंचतारांकित रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आयोजित या भव्य कार्यक्रमात देशातील विविध प्रांतांतून आलेल्या विद्वानांना पदक, प्रशस्तीपत्र व शाल प्रदान करून ‘विद्या वाचस्पती’ तसेच ‘विद्या सारस्वत सन्मान’ देऊन गौरविण्यात आले.
        या सोहळ्याचे मुख्य पाहुणे म्हणून राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठ, झांशीचे माजी कुलगुरू पद्मश्री डॉ. अरविंद कुमार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंदूभूषण मिश्रा हे होते. तसेच भारतीय जनता पार्टी (छत्तीसगड) चे प्रदेश उपाध्यक्ष प्रबल प्रताप सिंह जू देव यांची विशेष उपस्थिती लाभली. मुख्य वक्त्या म्हणून शिक्षणतज्ज्ञ व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋतू दुबे तिवारी उपस्थित होत्या. उत्तर मध्य रेल्वे, रेल्वे मंत्रालय भारत सरकारचे सदस्य डॉ. शिवाजी रामभाऊ शिंदे तसेच इस्पात मंत्रालय भारत सरकारचे माजी सदस्य डॉ. कुलवंत सिंह सलुजा यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमास लाभली.

          कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते मंत्रोच्चारासह दीपप्रज्वलन करून करण्यात आली. सन्मानित विद्वानांना मार्गदर्शन करताना मुख्य अतिथी पद्मश्री डॉ. अरविंद कुमार यांनी सांगितले की, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 343(1) नुसार हिंदीला भारताची राजभाषा घोषित करण्यात आले आहे. संविधानात हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता देण्याचा विचार होता. हिंदी भाषेची वाढती लोकप्रियता लक्षात घेता तिला राष्ट्रभाषेचा दर्जा देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

        मुख्य वक्त्या डॉ. ऋतू दुबे तिवारी यांनी युवापिढीने हिंदी भाषेचा अधिकाधिक वापर करावा असे आवाहन केले. या सन्मान सोहळ्यात देशातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ, लेखक, शिक्षक, साहित्यिक व विद्वानांनी हिंदी भाषेच्या उन्नतीसाठी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यापीठातर्फे उपस्थित मान्यवरांना स्मृतिचिन्ह व अंगवस्त्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आचार्य जानकी बल्लभ शास्त्री यांनी केले.

 🔴  ........................................................ 🔴

        महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालीवाल यांना पीएच.डी. प्रदान करताना मुख्य अतिथी पद्मश्री डॉ. अरविंद कुमार, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंदूभूषण मिश्रा, समन्वयक डॉ. शिवाजी शिंदे, मुख्य वक्त्या डॉ. ऋतू दुबे तिवारी, भाजप नेते प्रबल प्रतापसिंह जू देव आदी मान्यवर. 

🔴 ......................................................... 🔴

       विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंदूभूषण मिश्रा यांनी याप्रसंगी बोलतांना सांगितले की, हिंदी लेखन, शिक्षणाचा विकास, पर्यावरण जनजागृती, वैद्यकीय सेवा, विधी साहाय्य व समाजसेवा या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा सारस्वत सन्मान प्रदान केला जातो.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp