पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला राष्ट्रीय पुरस्कार ; चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा..... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

04/02/2026

पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला राष्ट्रीय पुरस्कार ; चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा.....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला राष्ट्रीय पुरस्कार ; चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा.....

          चोपडा येथील सी.बी.एस.ई. बोर्डाशी संलग्न असलेल्या पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला CED फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा ‘NEP–2020 अंमलबजावणीतील अग्रणी’ पंचतारांकित पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण समारंभात भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या NIOS चे उपसंचालक आलोक कुमार गुप्ता, नोएडा फिल्म सिटीचे संस्थापक डॉ. संदीप मारवा तसेच  प्रियदर्शी नायक यांच्या हस्ते पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधी सौ. दिपाली पंकज बोरोले व शाळेचे प्राचार्य मिलिंद पाटील यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला.

         या पुरस्काराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे देशभरातील सुमारे 29 हजार सीबीएसई शाळांमधून शेकडो शाळांची काटेकोर निवड प्रक्रिया पार पाडून पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलची निवड करण्यात आली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP–2020) ची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी, विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धती तसेच नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांमुळे शाळेने राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

          शाळेत आधुनिक शिक्षणाची सांगड घालत AI Learning (कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षण), अत्याधुनिक Space Lab व Robotics Lab यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती आणि तांत्रिक कौशल्यांचा विकास करण्यात येत आहे. भविष्यातील शिक्षणाच्या गरजा ओळखून राबविण्यात येणारे हे उपक्रम एनईपी–२०२० च्या उद्दिष्टांशी पूर्णतः सुसंगत आहेत.

या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश पंडित बोरोले, संस्थेचे अध्यक्ष पंकज बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक नारायण बोरोले, गोकुळ भोळे, प्राचार्य मिलिंद पाटील तसेच संपूर्ण शिक्षकवृंदाचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. या राष्ट्रीय पुरस्कारामुळे शाळेने राज्य व राष्ट्रीय पातळीवर केलेल्या उज्ज्वल कार्याची दखल घेण्यात आली असून पालकवर्ग व शिक्षण क्षेत्रातून शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp