चोपडा (प्रतिनिधी) : - -
चोपडा नगरपरिषद, चोपडा निवासी मालमत्ता करावरील व्याज व दंडावर अभय योजना...
50% तात्काळ सूट, उर्वरित 50% सूट मंजुरीसाठी प्रस्ताव...
चोपडा नगरपरिषदे मार्फत शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी निवासी मालमत्ता करावरील व्याज व दंडावर विशेष ‘अभय योजना’ राबविण्यात येत आहे. ही योजना दिनांक 25 मार्च 2026 पर्यंत लागू राहणार आहे. या योजने अंतर्गत निवासी मालमत्ताधारकांनी थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी कर एकरकमी भरल्यास, त्यांना मालमत्ता कराच्या थकबाकी वरील आकारण्यात आलेल्या व्याज व दंडावर 50% सूट तात्काळ देण्यात येणार आहे. तसेच उर्वरित 50% सूट मंजूर करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
नगरपरिषदेच्या नोंदीनुसार अनेक निवासी मालमत्तांवर मागील कालावधीतील कराची थकबाकी प्रलंबित आहे. नागरिकांना आर्थिक दिलासा मिळावा व थकबाकी नियमित व्हावी यासाठी नगरपरिषदेच्या वतीने ही विशेष अभय योजना राबविण्यात आली आहे.
चोपडा नगरपरिषदे मार्फत शहरातील सर्व निवासी मालमत्ताधारकांनी दिनांक 25 मार्च 2026 पूर्वी थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी कर एकरकमी भरून मालमत्ता कराच्या थकबाकीवर आकारण्यात आलेल्या व्याज व दंडावरील अभय योजनेचा लाभ घ्यावा.असे आवाहन रामनिवास झंवर - मुख्याधिकारी चोपडा नगरपरिषद, चोपडा यांनी केले आहे.
WhatsApp
No comments:
Post a Comment