चोपडा तालुक्यात गॅस, पेट्रोल व डिझेलचा मुबलक साठा ; नागरिकांनी संयम बाळगावा - - तहसीलदार भाऊसाहेब थोरात - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...
ताज्या बातम्या
मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)    |    बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288    |    निष्पक्ष आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा S Maharashtra 7 News...

Post Top Ad

Responsive Ads Here

13/03/2026

चोपडा तालुक्यात गॅस, पेट्रोल व डिझेलचा मुबलक साठा ; नागरिकांनी संयम बाळगावा - - तहसीलदार भाऊसाहेब थोरात


चोपडा (प्रतिनिधी) : - -

चोपडा तालुक्यात गॅस, पेट्रोल व डिझेलचा मुबलक साठा ; नागरिकांनी संयम बाळगावा - - तहसीलदार भाऊसाहेब थोरात

        सद्य : स्थितीत आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युध्दाच्या तणावपुर्ण पार्श्वभूमीवर चोपडा तालुक्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत आहे. त्यामुळे चोपडा तालुक्यामध्ये कार्यरत सर्वसाधारणपणे सर्वच गॅस एजन्सी व पेट्रोल पंपावर अतिरीक्त स्वरुपामध्ये गर्दी होत आहे. या संदर्भात सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, चोपडा तालुक्यामध्ये गॅस सिलेंडर, पेट्रोल व डिझेलचा साठा सद्य स्थितीत पर्याप्त प्रमाणामध्ये उपलब्ध असून नागरीकांना इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. सर्वच गॅस व पेट्रोल पंप कंपनीच्या विक्री अधीकारी / प्रतिनीधी यांना प्रशासनाच्या मार्फत इंधन पुरवठा सुरळीत ठेवणेकामी आवश्यक त्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच, तालुक्यातील सर्व कार्यरत गॅस एजन्सी व पेट्रोल पंप यांची देखील दिनांक 13/03/2026 रोजी बैठक घेऊन इंधन पुरवठा सुरळीत ठेवणेबाबत सुचना दिलेल्या आहेत. या बैठकीला तहसीलदार भाऊसाहेब थोरत, नायबतहसीलदार योगेश पाटील, नायबतहसीलदार (पुरवठा विभाग) किरण मेश्राम मॅडम, पुरवठा विभागाच्या गरुड मॅडम, पेट्रोल पंप व गॅस एजन्सीचे प्रतिनिधी तसेच बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.
          चोपडा तालुक्यात कोणत्याही प्रकारचा गॅस सिलेंडर, पेट्राल व डिझेलचा तुटवडा नाही. सर्व गॅस एजन्सी व पेट्राल पंपावर नियमितपणे इंधनाचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन गॅस एजन्सी व पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी करणे योग्य होणार नाही. अफवांवर विश्वास न ठेवता अधीकृत माहितीसाठी तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा. चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. नागरीकांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार भाऊसाहेब थोरात व नायबतहसीलदार (पुरवठा विभाग) किरण मेश्राम यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp