चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतनाच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी..... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...
ताज्या बातम्या
मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)    |    बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288    |    निष्पक्ष आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा S Maharashtra 7 News...

Post Top Ad

Responsive Ads Here

14/03/2026

चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतनाच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी.....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

        चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतनाच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी.....

          दोंडाईचा येथील अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आयोजित टेक स्पार्क 2K26 या राज्यस्तरीय तांत्रिक स्पर्धेत चोपडा येथील श्रीमती शरच्चद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग & पॉलिटेक्निक), चोपडा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. प्रोजेक्ट कॉम्पिटिशनमध्ये तंत्रनिकेतन विभागातील विद्युत विभागाच्या विद्यार्थ्यांनी “स्मार्ट सिंचन प्रणाली” हा प्रकल्प सादर करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. 

         या प्रकल्पासाठी कल्पेश योगेश पाटील, ओम शैलेश इखणकर, यशवंत मनोज पवार व लोकेश जगदीश सोनवणे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या यशाबद्दल त्यांना ₹1500 रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच Robotics and Automation या विषयाअंतर्गत आयोजित “रांगोळीची शक्ती” या स्पर्धेत दीपाली भारत पाटील व पूजा बाबुलाल चौधरी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांना ₹1000 रोख पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.या विद्यार्थ्यांना प्रा.भुषण पवार व विभागप्रमुख प्रा.कमलेश पाटील यांचे मागदर्शन लाभले. 

          या यशाबद्दल  महाविद्यालयाचे प्राचार्य  प्रा.व्ही. एन. बोरसे , दादासाहेब डॉ सुरेश जी पाटील महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.के एन सोनवणे , संस्थेचे अध्यक्ष अँड संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp