आई-मुलांचा भावनिक संगम; महिला दिन उत्साहात साजरा.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...
ताज्या बातम्या
मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)    |    बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288    |    निष्पक्ष आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा S Maharashtra 7 News...

Post Top Ad

Responsive Ads Here

09/03/2026

आई-मुलांचा भावनिक संगम; महिला दिन उत्साहात साजरा....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         आई-मुलांचा भावनिक संगम; महिला दिन उत्साहात साजरा....

         चोपडा येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज बालसंस्कार केंद्रात जागतिक महिला दिनानिमित्त ‘उगवतीचे रंग’ या विशेष नृत्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून मातृशक्तीचा गौरव करत आई-पाल्यांमधील प्रेम, जिव्हाळा आणि भावनिक नात्याचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात विभागप्रमुख मीना माळी  यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी महिलांचे कुटुंब, समाज आणि राष्ट्र घडविण्यातील अनन्यसाधारण योगदान अधोरेखित केले. ‘उगवतीचे रंग’ ही संकल्पना आई-मुलांमधील शब्दापलीकडील नाते नृत्याच्या माध्यमातून व्यक्त करण्यासाठी राबविण्यात आली असून हा कार्यक्रम केवळ कला सादरीकरण न राहता भावनांचा सुंदर उत्सव ठरल्याचे त्यांनी सांगितले.
          कार्यक्रमाच्या उद्घाटक वैद्य  प्राजक्ता महाले (आयुर्वेदाचार्य, आहार तज्ञ व गर्भसंस्कार तज्ञ) यांनी आपल्या मार्गदर्शनात सात्विक आहाराचे महत्त्व अधोरेखित करत गाईचे तूप, पालेभाज्या, तसेच गणपती स्तोत्र व गायत्री मंत्राचा नियमित जप यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, असे सांगितले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले, नवनिर्वाचित अध्यक्ष पंकज बोरोले यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिपाली बोरोले उपस्थित होत्या. मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील  यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी असे व्यासपीठ महत्त्वाचे असल्याचे सांगितले. महिलांनी केवळ घरापुरते मर्यादित न राहता स्वतःची ओळख निर्माण करत आत्मविश्वासाने व आनंदाने जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले. “आजचा कार्यक्रम म्हणजे महिला सन्मान, कुटुंबप्रेम आणि संस्थेच्या संस्कारप्रधान वाटचालीचा त्रिवेणी संगम आहे,” असे ते म्हणाले.
         या कार्यक्रमात आदिवासी नृत्य, गणेश वंदना, रिमिक्स सॉंग तसेच छत्रपती शिवरायांवरील गीतांवर महिला पालक आणि विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर केले. महिला शिक्षकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची रंगत वाढवली. सर्व सहभागींचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. समारोप प्रसंगी मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील यांनी मातृशक्तीला वंदन करत सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महिला सन्मान, कुटुंबप्रेम आणि संस्कारक्षम शिक्षण यांचा सुंदर मिलाफ घडवणारा ‘उगवतीचे रंग’ हा कार्यक्रम उपस्थितांसाठी आगळावेगळा आणि अविस्मरणीय ठरला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp