विवेकानंद विद्यालयाचे 12 विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकले - S Maharastra 7 News Reg No, MH-14-0018812
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

12/08/2026

विवेकानंद विद्यालयाचे 12 विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकले

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         विवेकानंद विद्यालयाचे 12 विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकले

          चोपडा येथील विवेकानंद विद्यालयात गुणवत्तेची परंपरा कायम राखत यंदाच्या स्कॉलरशिप परीक्षेत विद्यालयातील एकूण 12 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे इयत्ता चौथी स्कॉलरशिप मधून श्रेजल मोनेश बाविस्कर 292 गुण,  शिवम हिम्मतराव पाटील 200 गुण, काव्या विश्वदीप पाटील 192 गुण, सोहम नरेंद्र पाटील 182 गुण, निष्ठा पारस जैन 178 गुण प्राप्त तर इयत्ता सातवी स्कॉलरशिप मधून मानसी सुनील पाटील 230 गुण, मनाली प्रवीण पाटील 220 गुण, भूमिका प्रमोद चौधरी 210 गुण, विहान अमोल मोदी 210 गुण, आरोही जगदीश पाटील 208 गुण, पूर्वजा भूपेंद्र पाटील 194 गुण, मानस नरेंद्र पाटील 188 गुण प्राप्त करत गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले.

           इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका आशा चित्ते, उपशिक्षक संजय सोनवणे, उपशिक्षिका शुभांगी बोरसे, मेघा पाटील तर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना माजी मुख्याध्यापक नरेंद्र भावे, उपशिक्षिका नूतन चौधरी व राजेश्वरी भालेराव यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन मिळाले. 

           या  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल, सचिव ॲड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, मुख्याध्यापिका सरला शिंदे, पर्यवेक्षक पवन लाठी यांच्यासह सर्व पालकवृंद, शिक्षकवृंद व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp