चोपडा महाविद्यालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी - S Maharastra 7 News Reg No, MH-14-0018812
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

13/08/2026

चोपडा महाविद्यालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपडा महाविद्यालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी

           चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉक्टर सुरेश जी.पाटील महाविद्यालयात आज दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती (राष्ट्रीय ग्रंथपाल दिन) अत्यंत उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.मान्यवरांची उपस्थिती होती.

       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या एम. सोनवणे या होत्या. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे, उपप्राचार्य तथा ग्रंथालय समितीचे प्रमुख  ए. बी. सूर्यवंशी,  समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ आणि कॉलेजचे रजिस्ट्रार श्री. डी. एम. पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी आपल्या मनोगतपर भाषणात डॉ. रंगनाथन यांच्या ग्रंथालय क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचा गौरव केला. तसेच विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा व पुस्तकांचा जास्तीत जास्त वापर करून आपले ज्ञान समृद्ध करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून झाली.  

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक डॉ. व्ही. आर. कांबळे यांनी केले. त्यांनी ग्रंथालय शास्त्राचे महत्त्व आणि आजच्या डिजिटल युगातही पुस्तकांचे असणारे स्थान यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद दिला. कार्यक्रमाला महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाचे सौ. अश्विनी जाधव, श्री. शशिकांत चौधरी वा सर्व कर्मचारी, विविध शाखेचे प्राध्यापक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन रजिस्ट्रार श्री. डी. एम. पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp