चोपड्यात दूषित पाणीप्रश्नी विरोधक आक्रमक, दोषींवर कारवाईची जोरदार मागणी ; यावर न पा प्रशासनाचा खुलासा ~ ~ नगराध्यक्ष्याचे आवाहन - S Maharastra 7 News Reg No, MH-14-0018812
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

12/08/2026

चोपड्यात दूषित पाणीप्रश्नी विरोधक आक्रमक, दोषींवर कारवाईची जोरदार मागणी ; यावर न पा प्रशासनाचा खुलासा ~ ~ नगराध्यक्ष्याचे आवाहन

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपड्यात दूषित पाणीप्रश्नी विरोधक आक्रमक, दोषींवर कारवाईची जोरदार मागणी ; यावर न पा प्रशासनाचा खुलासा ~ ~ नगराध्यक्ष्याचे आवाहन 

         आज विरोधी पक्षातील नगरसेवकांनी चोपडा शहरातील जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि जीवन-मरणाशी संबंधित प्रश्नावर न पा प्रशासनाला जाब विचारत आहोत. चोपडा नगरपरिषदेचे प्रशासन आणि सत्ताधारी नागरिकांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ करत आहेत. शहरात अनेक दिवसांपासून गढूळ, दूषित आणि अस्वच्छ पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिक पाणीपट्टी भरतात, कर भरतात, पण त्याच्या बदल्यात त्यांना स्वच्छ पाणी नाही, तर आजार मिळत आहेत. हा जनतेवर झालेला अन्याय आहे. असे विरोधी नगरसेवकांनी सांगितले.

       आज विरोधी पक्षातील सर्व नगरसेवकानी अचानकपणे फिल्टर प्लांट ला भेट दिली तेथे बघितले की तेथे असलेल्या दूषित पाण्यामुळे नागरिकांमध्ये जुलाब, उलट्या, पोटदुखी, ताप, त्वचेचे विकार तसेच इतर जलजन्य आजारांचा धोका वाढल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. जर या निष्काळजीपणामुळे एखाद्या नागरिकाच्या जीवितास किंवा आरोग्यास हानी पोहोचली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी चोपडा नगरपरिषद प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची असेल. असेही ते म्हणाले.
         विरोधी नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारत अनेक प्रश्न उपस्थित केले 1) शहरात गढूळ पाणी का पुरवले जात आहे ? 2) पिण्याच्या पाण्याची नियमित प्रयोगशाळेत तपासणी होते का ? 3) तपासणीचे अहवाल जनतेपासून का लपवले जात आहेत ? 4) नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष का केले जात आहे ? 5) या गंभीर निष्काळजीपणासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर अद्याप कारवाई का झालेली नाही ? 6) आरोग्य व स्वच्छता विभागातील कर्मचारी पाणीपुरवठा विभागात काम कसे करतात.
           तसेच विरोधी नगरसेवकांनी अश्या ठाम मागण्या केल्या आहेत 1) पाण्याची तात्काळ प्रयोगशाळेत तपासणी करून अहवाल सार्वजनिक करावा 2) दोषी अधिकारी, कर्मचारी आणि संबंधितांवर कठोर शिस्तभंग व कायदेशीर कारवाई करावी. 3) शहरातील प्रत्येक नागरिकाला त्वरित स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. 4) भविष्यात अशी वेळ पुन्हा येणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना जाहीर कराव्यात. 5) आरोग्य विभागामार्फत शहरात विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबवावी.

         यावेळी सर्व विरोधी नगरसेवक म्हणाले आम्ही प्रशासनाला शेवटचा इशारा देत आहोत. जनतेच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही. जर तात्काळ ठोस कारवाई झाली नाही, तर आम्ही चोपडा शहरातील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करत लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरू. त्या आंदोलनाची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी नगरपरिषद प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर राहील. चोपड्याच्या जनतेला स्वच्छ पाणी मिळालेच पाहिजे. हा आमचा हक्क आहे, भीक नाही.

         आजच्या या पत्रकार परिषदेत गटनेता गजेंद्र जैसवाल, नगरसेविका सौ संध्या महाजन, सौ पूजा देशमुख, शकिलाबी बागवान, नगरसेवक डॉ रोहन पाटील, नरेंद्र पाटील, भूपेंद्र गुजराथी, शरद पाटील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र महाजन भा ज पा युवा मोर्चा उपाध्यक्ष करण वाडेकर आदी उपस्थित होते.

        या विषयी महाराष्ट्र 7 न्युजशी बोलतांना न पा प्रशासनाने खुलासा केला,  नागरिकांनी पाण्याच्या रंगामध्ये तात्पुरता बदल झाल्याने घाबरून जाऊ नये. पाणीपुरवठ्याची गुणवत्ता व नागरिकांचे आरोग्य यास सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक त्या सर्व उपाययोजना नगरपरिषदे मार्फत करण्यात येत आहेत. असे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

          नगराध्यक्ष यांचे नागरिकांना आवाहन

      चोपडा शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरावे तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा. नगरपरिषदे मार्फत नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेवर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp