Post Top Ad
Responsive Ads Here
09/08/2026
Home
Unlabelled
महाराष्ट्र शासन आयोजित बालचित्रकला स्पर्धा विवेकानंद विद्यालयात मोठ्या उत्साहाने संपन्न
महाराष्ट्र शासन आयोजित बालचित्रकला स्पर्धा विवेकानंद विद्यालयात मोठ्या उत्साहाने संपन्न
महाराष्ट्र शासन व उच्च व तंत्रशिक्षण विभाग कलासंचनालय महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धा 2026 दिनांक 8 ऑगस्ट 26 रोजी विवेकानंद विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीच्या एकूण 264 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवित संपन्न झाली.या स्पर्धेचा संपूर्ण नोंदणी यावर्षी ऑनलाईन पद्धतीने होती. चोपडा पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी अजित पाटील केंद्रप्रमुख दीपक पाटील स्पर्धा प्रमुख प्रशांत सोनवणे, मिलिंद पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सरला शिंदे व आशा चित्ते पर्यवेक्षक पवन लाठी व संजय सोनवणे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकांच्या सहकार्याने विद्यालयाचे तंत्रस्नेही कलाशिक्षक राकेश विसपुतेयांनी स्पर्धेचे सुंदर नियोजन करत स्पर्धा संपन्न केली. विद्यार्थ्यांच्या आत असलेला बालचित्रकारासाठी शासनातर्फे घेण्यात आलेली ही स्पर्धा मुलांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशा भावना पालक वर्गांकडून व्यक्त होत होत्या तालुकास्तर जिल्हा सर्व राज्यस्तर असे विद्यार्थ्यांना बक्षीस यात मिळणार आहेत इतक्या मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी होणारी तालुक्यातील एकमेव शाळा यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर , उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल, सचिव ॲड. रवींद्र जैन , सहसचिव डॉ. विनीत हरताळकर , माजी मुख्याध्यापक व संस्थेचे विश्वस्त नरेंद्र भावे यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळ , पालकवृंद , शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here




No comments:
Post a Comment