महिला केंद्रित योजनांचा लाभ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचविण्यावर भर द्यावा - आ. चित्राताई वाघ यांचे चोपड्यात संधटनात्मक बैठकीत आवाहन - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

17/08/2026

महिला केंद्रित योजनांचा लाभ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचविण्यावर भर द्यावा - आ. चित्राताई वाघ यांचे चोपड्यात संधटनात्मक बैठकीत आवाहन

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          महिला केंद्रित योजनांचा लाभ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचविण्यावर भर द्यावा - आ. चित्राताई वाघ यांचे चोपड्यात संधटनात्मक बैठकीत आवाहन 

         भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा (जळगाव पूर्व) च्या वतीने आज चोपडा येथील लक्ष्मीनारायण लॉन्स अँड रेसिडेंसी येथे संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान प्रदेशाध्यक्ष महीला मोर्चा आमदार सौ. चित्राताई वाघ यांनी भूषविले. तसेच भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा, नगरसेवक संध्याताई महाजन, जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, नरेश महाजन (महाराष्ट्र-गुजरात-मध्य प्रदेश माळी समाज सदस्य), मंडळ अध्यक्ष कांतीलाल पाटील, नरेंद्र पाटील, पिंटू पावरा, न पा गटनेता गजेंद्र जैस्वाल, अशोक शिंपी, देवदत्त वैद्य व सर्व भाजपा पदाधिकारी यांच्या नेतृत्वात यशस्वीरित्या संपन्न झाली.
          या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार सौ. चित्राताई वाघ, प्रदेश प्रभारी सौ. सविताताई जैसवाल, धुळे महापौर, प्रदेश सचिव रेखाताई वर्मा, प्रदेश महामंत्री महिला मोर्चा सौ. जयश्री कमलाकर अहिरराव प्रमुख पाहुणे व जळगाव जिल्हा पुर्व मधील महीला पदाधिकारी म्हणून उपस्थित होत्या. बैठकीत जळगाव पूर्व विभागातील महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक कार्याचा सविस्तर आढावा घेतला. बूथ स्तरापासून ते प्रभाग स्तरापर्यंतच्या कामकाजाची चर्चा करण्यात आली. संघटन बांधणी, महिला सक्षमीकरणाच्या विविध योजनांचा प्रचार-प्रसार आणि आगामी काळातील कार्यक्रमांबाबत सखोल विचारमंथन झाले.
           सौ. चित्राताई वाघ यांनी आपल्या मार्गदर्शनात महिला मोर्चाला अधिक गतिमान आणि प्रभावी बनविण्याचे आवाहन केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वा खालील महिला केंद्रित योजनांचा लाभ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचविण्यावर भर द्यावा असे अधोरेखित केले. सौ. जयश्री कमलाकर अहिरराव यांनी संघटनात्मक बळकटीसाठी स्थानिक पातळीवर सक्रिय सहभागाची गरज व्यक्त केली, तर रेखाताई वर्मा यांनी महिला मोर्चाच्या कार्यात अधिक गती आणण्याबाबत मार्गदर्शन केले, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष संध्याताई महाजन यांनीही सर्वांनी एकत्रितपणे काम करून महिला शक्तीला पुढे नेण्याचे आवाहन केले.

            बैठकीस महिला मोर्चाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होत्या. ही बैठक संघटनात्मक बळकटी आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp